सातारकरांनाे आली बघा गुड न्यूज : चार वर्षाच्या बालकासह 60 जण कोरोनामुक्त

सातारकरांनाे आली बघा गुड न्यूज : चार वर्षाच्या बालकासह 60 जण कोरोनामुक्त

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना आज (शनिवार) दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 व 28 वर्षीय पुरुष, 31,75,19 व 40 वर्षीय महिला,  तांबेआळी येथील 50 वर्षीय पुरुष, चव्हाण आळी शिरवळ येथील 20 वर्षीय तरुण, शिंदेवाडी येथील 36 व 30वर्षीय पुरुष, शिरवळ येथील आशबी कंपनी येथील 21 वर्षीय तरुण, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील 50 वर्षीय पुरुष, अपशिंगे  येथील 18 वर्षीय तरुण, करंजे येथील 40 वर्षीय पुरुष, खावली येथील 46 वर्षीय पुरुष,लींब येथील 40 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील चोपडी येथील 60 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील आगाशीवनगर येथील  32 व 24 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 62 वर्षीय पुरुष,53 वर्षीय महिला, वडगांव येथील 28 वर्षीय महिला, गोवारे येथील 24 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 40 वर्षीय पुरुष, तारुख येथील 40, 60 वर्षीय पुरुष, खंडोबानगर मलकापूर येथील 33 वर्षीय महला, जखीनवाडी येथील 23 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 70,45व 23 वर्षीय महिला, 32 वर्षीय ग्रामीण रुग्णालय कराड येथील आरोग्य सेवीका, हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, गोलेश्वर येथील 12 वर्षाचा बालक, 36 वर्षीय महिला, खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, 
वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, 55 व 27 वर्षीय महिला, 11 वर्षाचे बालक,खानापुर येथील 49 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष,981 ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला व 4 वर्षाचे बालक व 8 वर्षाची बालीका, सोनजी विहार बावधन नाका येथील 40 वर्षीय महिला, 20 व 16 वर्षीय तरुणी, शिरगांव येथील 31 वर्षीय पुरुष, खडकी येथील 53 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला व 22,17 व 15 वर्षीय तरुण, कोरेगांव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिलाव 6 वर्षाची बालीका. 

490 जणांच्या घशातील नमुना पाठविला तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 44, स्व.  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील  67, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगांव येथील 51, वाई येथील 64,शिरवळ येथील  91, रायगांव येथील 54, पानमळेवाउी येथील 24, मायणी येथील 37, महाबळेश्वरयेथील 5, खावली येथील 14 असे एकूण 490 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याता आले असून एन. सी.सी.एस. पुणे  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजेंनी का बरं मानले अजित पवारांचे आभार, वाचा सविस्तर

जाणून घ्या महावितरणचा व्हॉट्‌सऍप क्रमांक; घरुनच नोंदवा विजेबाबतच्या तक्रारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com