Indian Navy : वाईच्या स्नेहांजलीची सब लेफ्टनंटपदी निवड

Snehanjali Nanavare
Snehanjali Nanavareesakal
Summary

स्नेहांजलीचे लष्करी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते आणि त्यात ती..

वाई (सातारा) : येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे (Snehanjali Rajendra Nanavare) हिची भारतीय नौदलात (Indian Navy) सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली. त्यासाठी एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी ती जाणार आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्य दलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले. अपार कष्ट, वेळेचे नियोजन आणि कुटुंबीयांची साथ असेल तर मोठे ध्येय गाठता येते, असे तिने ‘ई-सकाळ’शी बोलताना सांगितले.

तिच्या आई- वडिलांचा गृह उद्योग आहे. दोघेही कराटे चॅम्पियन (Karate Champion) आहेत. त्यामुळे लहानपणापासून आई- वडिलांनी खेळाला प्राधान्य आणि प्रोत्साहन दिले. स्नेहांजलीने ‘धनुर्विद्या’ या खेळात तालुकास्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पदके मिळवली. अभ्यासातही तितकेच लक्ष घातले. तिचे लष्करी अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेळेचे नियोजन केले. खेळ, व्यायाम आणि अभ्यास याचे वेळापत्रक तयार केले. त्यानुसार मेहनत घेतली. तिची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट या प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवड झाली.

Snehanjali Nanavare
'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सच्चा कार्यकर्त्याला अध्यक्षपद द्या'

भारतातून अनेक मुले-मुली त्यासाठी आले होते. विविध परीक्षा, निकष यातून एकेक पायरी पार करीत ती या पदापर्यंत पोचली. आज सैन्य दलात दाखल होणाऱ्या मुलीची संख्या लक्षणीय आहे. तिच्या या यशात आई आरती, वडील राजेंद्र, बहीण राष्ट्रीय खेळाडू ओमश्री यांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रवासात अनेक शिक्षक, मार्गदर्शकांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले. स्नेहांजलीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमीत, तर महाविद्यालयीन शिक्षण किसन वीर महाविद्यालयात कला शाखेत झाले. बीएमध्ये इंग्रजी विभागात शिवाजी विद्यापीठात तिचा प्रथम क्रमांक आला होता.

Snehanjali Nanavare
'नारायण राणे म्हंटल्याप्रमाणं काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com