कऱ्हाडात तब्बल आठ हजार इमारतींवर सौर पॅनेल; ग्रीन बिल्डिंगला पालिकेकडून 'सूट'

Solar Panel
Solar Panelesakal

कऱ्हाड (सातारा) : शहरात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊ लागल्याचे पालिकेच्या नुकत्याच एका पाहणीत निष्कर्ष समोर आला आहे. पालिकेच्या (Karad Municipality) इमारतीवर तब्बल 120 सौर पॅनेल (Solar Panel) बसविल्याने तेथील सारी यंत्रणा आता सौर ऊर्जेवर चालते. पर्यायाने पालिकेची बचत होते आहे. तो आदर्श घेत शहरातील तब्बल आठ हजार इमारतींवर सध्या सौर ऊर्जा कार्यान्वित झाली आहे. पालिकेने "माझी वसुंधरा' अभियानाच्या निमित्ताने केलेल्या पाहणीत 19 हजार मिळकतधारकांपैकी आठ हजार इमारतींवर सौर ऊर्जेची यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसते. (Solar Panel Project On Eight Thousand Buildings At Karad Satara Marathi News)

Summary

शहरात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊ लागल्याचे पालिकेच्या नुकत्याच एका पाहणीत निष्कर्ष समोर आला आहे.

शहरातील विविध भागांतील इमारतींवर खासगी लोकांनी सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. त्यात तब्बल आठ हजार इमारतींचा समावेश आहे. आठ हजार इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवले आहेत. त्यात शिवाजी हाउसिंग सोसायटी, सोमवार व शुक्रवार पेठेत हे प्रकल्प आहेत. पालिकेने ग्रीन बिल्डिंगला (Green Building) प्रोत्साहन देऊन करात पाच टक्के सूटही दिली आहे. मात्र, सौर ऊर्जेचा पर्याय नागरिकांनी स्वतःहून निवडला आहे. सौर ऊर्जेच्या वापराची सुरवात पालिकेने केली. पालिका मुख्य इमारतीवर सौर ऊर्जेचे 120 पॅनेल बसवले. त्या पॅनेलव्दारे मिळणाऱ्या ऊर्जेमुळे पालिकेचा विजेवरील होणारा अतिरिक्त खर्च कमी झाला आहे. पालिकेला मिळालेले रिझल्ट "माझी वसुंधरा'च्या निमित्ताने शहरात पालिकेने सांगितला. मागील वर्षापासून त्याची जागृती सुरू आहे. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसते आहे.

पालिकेने केलेल्या पाहणीत शहरातील आठ हजार इमारतींवर सौर ऊर्जाचे प्रकल्प उभे आहेत. सौर ऊर्जेत नागरिकांनी घेतलेल्या सहभागामुळे शासनाच्या "माझी वसुंधरा' अभियानालाही यश आले आहे. ग्रीन बिल्डिंगला पालिकेने प्रोत्साहन दिले आहेच, आता सौर ऊर्जेसाठी आम्ही प्रयत्न करू.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Solar Panel Project On Eight Thousand Buildings At Karad Satara Marathi News

Solar Panel
विषाणूच्या गुणसूत्रांतील बदलाचा शोध; साताऱ्यातील 131 जणांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com