बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! जवान प्रदीप चव्हाणांच्या चित्रांचे देशभर प्रदर्शन

राजेंद्र शिंदे | Wednesday, 27 January 2021

मी सर्व चित्रांत हरवून जाऊ लागलो. या सर्जनशीलतेची पोचपावती वरिष्ठांकडून वेळोवेळी मिळत गेली असे हरहुन्नरी जवान प्रदीप चव्हाण यांनी नमूद केले.

खटाव (जि. सातारा) : खटाव येथील जवानाने सैन्यदलातून देशसेवा करतानाच चित्रकलेचाही छंद जोपासला आहे. शाळेच्या पाटीपासून सुरू झालेला हा चित्रकलेचा प्रवास कॅनव्हॉस क्‍लॉथ, सुंदर भिंती, रेशीम कापड, वेगवेगळे चित्र-विचित्र दगड व लाकडांवरील नजाकतीने काढलेल्या सुंदर नक्षीपर्यंत पोचला आहे. स्थिरचित्र, निसर्गचित्र व व्यक्तिचित्र अशा प्रकारात 200 चित्रं त्यांनी रेखाटली आहेत. आजपर्यंत सैन्यदलाने त्यांच्या चित्रांचे मिरत, उत्तर प्रदेश, चंदीगड, पंजाब, लेह व लडाख येथे प्रदर्शन भरवले आहे. प्रदीप चव्हाण असे या हरहुन्नरी जवानाचे नाव.
 
प्रदीप चव्हाण यांचे खटाव हे मूळ गाव. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड. आजही त्यांनी ती जपली आहे. परिस्थितीमुळे 2006 मध्ये ते सैन्यदलात भरती झाले. पण, मनाच्या कप्प्यात जपलेली चित्रकला त्यांना स्वस्थ बसू देईना. नोकरीच्या ठिकाणीही फावल्या वेळेत त्यांनी आपली कला जोपासली. एखादं चित्र पाहिल्यानंतर ते हुबेहूब पेपरवर रेखाटू लागले. आत्तापर्यंत प्रदीप यांनी स्थिरचित्र, निसर्गचित्र व व्यक्तिचित्र अशी 200 चित्रं रेखाटली आहेत. निसर्गचित्र ते लिलया काढतात. कास पठाराच्या तरल व उत्स्फूर्त चित्राने प्रदर्शनात अनेकांना भुरळ घातली आहे. 14 वर्षांच्या काळात गोठवणारी जम्मू-काश्‍मीरमधील थंडी, राजस्थानचे वैराण वाळवंट आदी भौगोलिक वैविध्यता असलेल्या देशात फिरून हे परिसर कुंचल्याच्या साह्याने त्यांनी हुबेहूब रेखाटलेत. वरिष्ठांनी त्यांच्या चित्रांचे वेळोवेळी भरभरून कौतुक केले. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवून कलेचा गौरव केला आहे. आजपर्यंत आर्मीने त्यांच्या चित्रांचे मिरत, उत्तर प्रदेश, चंदीगड, पंजाब, लेह व लडाख येथे प्रदर्शन भरवले आहे. एक दिवस जहॉंगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा त्यांचा मानस आहे. 

तुमच्या मदतीशिवाय तीरा तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी

लष्करी सेवेत चित्रांचा फायदा 

Advertising
Advertising

चित्रकलेच्या छंदाचा मला माझ्या 14 वर्षांच्या खडतर लष्करी सेवेत खूप फायदा झाला. सुटी संपल्यावर घरचा निरोप घेऊन ड्युटीवर परत जाताना मनात भावनांचा कल्लोळ उठायचा. मला माझ्या छंदाने या भावना कल्लोळातून मुक्त केलं. मी या सर्व चित्रांत हरवून जाऊ लागलो. या सर्जनशीलतेची पोचपावती वरिष्ठांकडून वेळोवेळी मिळत गेली. आज माझ्या दोन्ही लहान मुली मोकळ्या वेळेत मोबाईल वा टीव्हीमध्ये न गुंतता पेन्सिल घेऊन त्यांच्यातील सुप्त गुण कागदावर उमटू पाहताना दिसतात. हे माझ्यासाठी खूप आहे, असे प्रदीप चव्हाण आवर्जून सांगतात.

शाळेला जाणार आम्ही! जावळी खाे-यातील विद्यार्थ्यांसह शिक्षक खूष

Republic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील

Edited By : Siddharth Latkar