esakal | लडाखाच्या दरीत जवानाचा मृत्यू; परळी खाे-यात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

लडाखाच्या दरीत जवानाचा मृत्यू; परळी खाे-यात हळहळ

काळोशीसह परळी खोऱ्यात ते सुपरिचित होता. त्यांच्या जाण्याने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लडाखाच्या दरीत जवानाचा मृत्यू; परळी खाे-यात हळहळ

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : परळी खाे-यातील काळोशी (ता.सातारा) येथील सूरज लक्ष्मण लामजे (वय २८) या जवानाचा लडाख (जम्मू काश्मीर) येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. सूरज यांचे पार्थिव आज (रविवार) सायंकाळी सातारा जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. 

सूरज लक्ष्मण लामजे हे सन २०१४ मध्ये मुंबईत लष्करात भरती झाले होते. त्यानंतर बंगळूर येथे त्यांचे प्रशिक्षण झाले. सध्या ते लडाख येथे कर्तव्य बजावत होते. सूरज हे चालक असल्याने शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास सैन्य दलातील साहित्य घेऊन जात असताना त्यांचे वाहन दरीत कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बेस्टच्या सेवेतून काेराेनाची बाधा; महाबळेश्वरातील एसटी कर्मचारी धास्तावले
 
लामजे यांचे पार्थिव आज (रविवार) सायंकाळी पाच वाजता पुण्याहून साता-याला आणण्यात येणार आहे. त्यानंतर लामजे यांच्या गावी काळाेशी (अंबवडे बुद्रुक) येथे पार्थिव नेण्यात येईल. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सूरज हे मनमिळाऊ स्वभावाचे हाेते. काळोशीसह परळी खोऱ्यात ते सुपरिचित होता. त्यांच्या जाण्याने परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सैनिकांनाे! दीपावलीनिमित्त मिलिटरी कॅंटीन सुरु राहणार

loading image