बामणोली-तापोळा जोडणारी लॉंच त्वरित सुरू करा : राजेंद्र संकपाळ

सूर्यकांत पवार
Thursday, 24 September 2020

गेले कित्येक दिवस सरकारी लॉंच बंद असल्याने भागातील जनतेस बराच त्रास सहन करावा लागत आहे. कोणी आजारी पडले तर रुग्णांच्या नातेवाईकांना हजारो रुपयांच्या वर भाडे देऊन खासगी बोट आणाव्या लागतात. ज्या ठिकाणी सरकारी लॉंचचे तिकीट 20 रुपये आहे, त्या ठिकाणी हजार रुपये द्यावे लागतात आणि ते जरी दिले तरी खासगी लॉंच वेळेवर मिळतील असे नाही, असे सरपंच राजेंद्र संकपाळ यांनी सांगितले.

कास (जि. सातारा) : कोयना, सोळशी, कांदाटी खोऱ्यात बामणोली-तापोळ्याला जोडणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व्हिस लॉंच कोरोना महामारीत बरेच दिवस बंद आहेत. ही लॉंच सेवा सुरू झाली तर कांदाटी, सोळशी, कोयना भागातील गोरगरीब जनतेला तापोळा, बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत वेळवर उपचार मिळतील. त्यासाठी बामणोली व तापोळ्याला जोडणारी सरकारी लॉंच सेवा सुरू करावी, अशी मागणी बामणोलीचे सरपंच राजेंद्र संकपाळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

पत्रकात श्री. संकपाळ यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक दिवस सरकारी लॉंच बंद असल्याने भागातील जनतेस बराच त्रास सहन करावा लागत आहे. कोणी आजारी पडले तर रुग्णांच्या नातेवाईकांना हजारो रुपयांच्या वर भाडे देऊन खासगी बोट आणाव्या लागतात. ज्या ठिकाणी सरकारी लॉंचचे तिकीट 20 रुपये आहे, त्या ठिकाणी हजार रुपये द्यावे लागतात आणि ते जरी दिले तरी खासगी लॉंच वेळेवर मिळतील असे नाही. शिवाय आज डिझेल 80 ते 90 रुपयांच्या घरात असल्याने एका माणसाला कमी दराने, कमी भाड्यात लॉंच मालकांना ने-आण करणे परवडत नाही. 

बोगस पदभरती प्रकरणात चौकशी समिती; तत्कालीन अधिकाऱ्यांकडे चौकशीचा तगादा

आज या महामारीच्या काळात व्यवसाय, उद्योग, रोजगार बुडाल्यामुळे लोकांना एवढे पैसे देणे परवडत नाही. पर्यायाने लोक आजारपण अंगावर काढत आहेत. वाघावळे येथे प्राथमिक उपकेंद्र आहे. पण, तिथे पुरेशा सोयी असतील असे नाही. एकदा का रुग्ण तापोळा किंवा बामणोली येथे आला की परिस्थिती पाहून त्याला सातारा, पुणे येथे हलवणे सोपे होते. या परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर लॉंच सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start The Launch Connecting Bamnoli-Tapola Satara News