घर खरेदीदारांत कहीं खुशी, कहीं गम; दरवाढीचा सर्वसामान्यांना धक्का!

बाळकृष्ण मधाळे | Thursday, 17 September 2020

सातारा नोंदणी व मुद्रांक कार्यालयानेही जिल्ह्यातील विविध क्षेत्रासाठीचे रेडीरेकनरचे दर जाहीर केले आहेत. जिल्ह्यात रेडी रेकनरच्या दरात सरासरी २.२३ टक्के सरासरी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काही दिवस अगोदर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली होती. सातारा शहरात ०.०९ टक्के, तर ग्रामीण भागात ३.३० टक्के रेडी रेकनरवर दर आहे.

सातारा : मुद्रांक शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना एकेकीकडे दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे वाढीव दर कमी करण्याची मागणी होत आहे. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्याने स्वप्नातील घर साकारण्यास मदत होणार आहे. ५ टक्के असलेले मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने ग्राहकांना लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.

मात्र, दोन वर्षांनी सातारा जिल्ह्याच्या रेडी रेकनर दरात २.२३ टक्के वाढत केल्याने धक्का बसला आहे. सातारा शहरात ०.०९ टक्के, तर ग्रामीण भागात ३.३० टक्के रेडी रेकनरवर दर असून ही वाढ मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कहीं खुशी कहीं गम, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर लागू होतात. त्यासाठी रेडी रेकनदर दराचा प्रारुप आराखडा नोंदणी आर्थिक विभागाकडून तयार केला जातो. मंदीच्या सावटाखाली असलेल्या 'रिअल इस्टेट' क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी, तसेच सरकारी प्रकल्पासाठी संपादित जमिनीपोटी द्याव्या लागणाऱ्या कुठे मोबदल्याचा वाढता आर्थिक ताण जिल्ह्यातील कमी करण्यासाठी जमिनीच्या बाजारमूल्यातील वाढ काही प्रमाणात मर्यादित ठेवण्यात आली. गेल्या दोन वर्षांत सातारा जिल्ह्यात रेडी रेकनरदरात वाढ झाली नव्हती. 

साताऱ्यात घर, शेतजमिन घेताना वाचताहेत पैसे; कसे ते वाचा !

कोरोनाचे संकट असल्याने यंदाही दरवाढ होणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दरवाढ करून सरकारने सर्वसामान्यांना धक्का दिला.राज्याच्या नोंदणी विभागाकडून  यावर्षीचे रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सातारा नोंदणी व मुद्रांक कार्यालयानेही जिल्ह्यातील विविध क्षेत्रासाठीचे रेडीरेकनरचे दर जाहीर केले आहेत. जिल्ह्यात रेडी रेकनरच्या दरात सरासरी २.२३ टक्के सरासरी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काही दिवस अगोदर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली होती. नगरपालिका व नगरपंचायत हद्दीत झालेल्या सदनिका, दुकाने यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांच्या आधारे रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे. 

गावगाड्यावरचं दुःख कधी नजरेस पडणार?; बुरुड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

ज्याठिकाणी जेथे खरेदी विक्री व्यवहार नाहीत तेथे फार बदल झाले नाहीत. शहरी क्षेत्रात ०.०९ टक्के वाढ करण्यात आली. त्यामध्ये सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, म्हसवड, रहिमतपूर, मलकापूर, पाचगणी या नगरपालिका तसेच कोरेगाव, खंडाळा, मेढा, दहिवडी, वडूज, पाटण, लोणंद या नगरपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ३.३० टक्के तर प्रभाव क्षेत्रासाठी सर्वाधिक ३.३१ टक्के रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली आहे.

पोलीस भरती रद्द करा; सातारचे राजे सरकारवर भडकले!

कोरोनाचे संकट असताना राज्य सरकारने एकीकडे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी केली. मात्र, दुसरीकडे वार्षिक मूल्यदर तक्ते (रेडी रेकनर) दरात वाढ केली आहे. याचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकराची रक्कम रेडीरेकनर मधील बांधकाम दराने आकारली जाते. सन २०२०-२१ चे दर सन २०१९-२० च्या दरापेक्षा १० टक्के जास्त आहेत. जो प्रत्यक्ष येणाऱ्या बांधकाम खर्चापेक्षा पूर्वीपासूनच जास्त व अवास्तव आहे. भराव्या लागणाऱ्या बांधकाम कामगार कल्याण उपकराच्या रक्कमा यामुळे मोठा फरक पडणार आहे. राज्य शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा व ही दर वाढ मागे घ्यावी. 

मजीद कच्छी, संचालक, कच्छी प्रॉपर्टीस