कऱ्हाड तहसील कार्यालयाचे काम ठप्प

महसूल कर्मचारी संपामुळे कऱ्हाडला ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय
statewide strike State Revenue Employees Union update Tehsil office work stalled
statewide strike State Revenue Employees Union update Tehsil office work stalledSakal

कऱ्हाड : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून सुरू केलेला राज्यव्यापी संप आज तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. संपात महसूल कर्मचारी सहभागी झाल्याने तहसील, प्रांताधिकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले असून, कामानिमित्त आलेल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. महसूल सहायकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड-दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.

अव्वल कारकून आणि मंडलाधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असून, याबाबतचे पत्र तातडीने रद्द करावे, या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. संपामुळे प्रांत, तहसील कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले आहे. प्रांत, तहसील कार्यालयांतील अधिकारी कार्यालयात उपस्थित आहेत. मात्र, कर्मचारीच नसल्याने कार्यालयातील एकही फाईल हालत नाही, अशी स्थिती आहे.

त्यातच कामासाठी दूरवरून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना संपाची माहिती नसल्याने त्यांना पैसे व वेळ खर्च करून कामही होत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांना तीन दिवसांपासून काम न झाल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागले. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com