सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?

सिद्धार्थ लाटकर | Wednesday, 13 January 2021

पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रात आणि जिथे अंधश्रध्देच्या विचारांची धारणा घेत साता-यात (Satara) अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीची सुरवात झाली अशा सातारा जिल्ह्यातच अशा पद्धतीची ही अंधश्रद्धा असणं म्हणजे गंभीर बाब आहे.

सातारा : राज्यातील एका जिल्ह्यात सरपंचपदासाठी काेट्यावधी रुपयांची बाेली लागल्याचे माध्यमातून काही दिवसांपुर्वीच पाहिले. त्यावरुन गदाराेळ देखील झाला. मात्र महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात असलेल्या राजपुरी या गावात मात्र सरपंच पद नकाे रे बाबा ! असं म्हणत हे पद स्विकारण्यास सदस्य तयार हाेत नाहीत. पद स्विकारणा-यावर अघटित घडते अशी अंधश्रद्धा येथील लाेकांवर बिंबवली गेली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राज्यातील बुहतांश ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Election) बिनविरोध झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सरपंचपद निवडले गेले. येत्या 15 तारखेस मतदान हाेणार आहे. अनेक गावांमध्ये आपलेच पॅनेल यावे यासाठी प्रचाराच धूरळा उडाला आहे. सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुक झाल्यानंतर जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे पॅनेल प्रमुखांसह इच्छुक कार्यकर्ते जाेमात प्रचार करीत आहेत.

राजेंच्या कृतीने भाजपात नाराजी; पालिका निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्वाचा निर्धार

सरपंच पदासाठी लाखो रुपये खर्च करून घेऊन पद मिळवतात तर अनेक जण निवडणूक लढवताना लाखो रुपये खर्च करून हे पद मिळवण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला अशी परिस्थिती आहे तर दुसर्‍या बाजूला सातारा जिल्ह्यातील राजापूरी (महाबळेश्वर नजीक) या गावात जवळपास गेले पाच वर्षे कोणीही सरपंच होण्यासाठी तयार नाही अशी चर्चा उठली. सर्व कारभार हा उपसरपंच संभाळत आहे. त्याचे कारण मात्र सर्वांना धक्का देणारे आहे. जो सरपंच होतो त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या राजापुरे गावातील ग्रामस्थांमध्ये बिंबवली गेली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Advertising
Advertising

या ग्रामपंचायतीवर सत्वशिला राजपुरे,  अशोक राजपुरे, किसन राजपुरे, रामचंद्र राजपुरे हे चाळीशीतील, पन्नाशीतील सदस्य सरपंच झाले. काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे पद घेतल्यावर मृत्यू होतो अशी चर्चा गावात पसरली आहे. त्यातूनच काही काळ येथील सरपंचपद रिक्त राहिल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान ही अंधश्रद्धा आहे निसर्ग नियमानूसार संबंधित सदस्यांचा मृत्यू झाला आहे. नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावातील एक जण सरपंच पदासाठी तयार आहेत. त्या महिला आहेत. त्यांनी यंदा गावाला तसे कळविले देखील आहे असे एका ग्रामस्थाने सांगितले. 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात
 

आमच्या गावाच्या सरपंचबाबत काही वावड्या उठल्या आहेत. खरं तर आरक्षणामुळे काही वेळेला सरपंचपद रिक्त राहिले
आहे. काही गाेष्टी घडल्या परंतु ते निसर्ग नियमानूसार झाल्या आहेत. तरी सरपंचपदाबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नका. 

- माजी उपसरंपच, अजय शंकर राजपूरे 

सन 2010-15 या कालावधीत माझी पत्नी लक्ष्मी हिने सरपंचपदाचा उत्तम कारभार केला. आमच्या गावाला अंधश्रद्धेच्या नावाखाली जाणून बाजून सरपंचपदाबाबत काेणी तरी अफवा पसरवत आहे. ग्रामपंचायत आणि गावाला बदनाम करण्याचा
प्रयत्न हाेत आहे. 

- विलास शंकर राजपूरे

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा