esakal | Success Story : मुरमाड 38 गुंठ्यात शेतकऱ्याने मिळवले खरबूज, मिरची, फ्लॉवरमधून तब्बल दहा लाख
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

शेवाळवाडीत शेतकऱ्याने मुरमाड माळरानावर मल्चिंग पेपरवर खरबूज, मिरची आणि फ्लॉवर यांची शेती फुलवली आहे.

Success Story : मुरमाड 38 गुंठ्यात शेतकऱ्याने मिळवले खरबूज, मिरची, फ्लॉवरमधून तब्बल दहा लाख

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : पाण्याची कमतरता, प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर मात करून शेवाळवाडी (टाळगाव) येथील शेतकरी दत्तात्रय शेवाळे यांनी 38 गुंठे मुरमाड माळरानावर मल्चिंग पेपरवर खरबूज, मिरची आणि फ्लॉवर यांची शेती फुलवली आहे. प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली असून, सुमारे दहा लाखांवर उत्पन्न अपेक्षित आहे. 

येथील श्री. शेवाळे परिसरातील एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. या वेळेस त्यांना मुरमाड 38 गुंठे क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर मिरची, खरबूज, फ्लावर ही पिके घेण्याचे नियोजन केले. पाणी कमी असल्याने पिकाला ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रारंभी जमिनीची उभी- आडवी नांगरट केली. खत टाकले आणि त्यानंतर पाच फुटांचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरून त्यामध्ये मिरची, खरबूज, फ्लॉवर पिकांची लागवड केली. ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला. 

Breaking News : प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडेंसह 20 जणांवर खुनाचा गुन्हा 

सध्या पिके उत्तम असून, उत्पन्न सुरू झाले आहे. सध्या मिरची 35 रुपये किलो आणि खरबूज 22 रुपये किलो याप्रमाणे मागणी आहे. कऱ्हाड, रत्नागिरी बाजारपेठेत मालाला मागणी आहे. यातून मिरची सुमारे 22 टन, खरबूज 12 टन, फ्लॉवर चार टन उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा विश्वास श्री. शेवाळे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. कमी पाण्यावर राबवलेला प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी प्लॉटला भेटी देत आहेत व श्री. शेवाळे यांचे कौतुक करत आहेत. 

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top