साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करा; 'रयत'ची साखर आयुक्तांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Factory

शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करणे बंधनकारक आहे.

Sugar Factory : साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करा; 'रयत'ची साखर आयुक्तांकडे मागणी

कऱ्हाड - शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करणे बंधनकारक आहे. सतारा जिल्ह्यातील कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु १५ दिवस झाले तरीही कऱ्हाड तालुक्यातील रयत अथनी वगळता ईतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. ऊसदर जाहिर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर येत्या तीन दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनातील माहिती अशी - सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरु करुण १५ दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतु जिल्ह्यातील रयत अथनी शूगर हा कारख़ाना वगळता इतर कुणीही आपला दर जाहीर केलेला नाही. रयत क्रांती संघटना व ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने ऊस दर जाहिर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर येत्या दोन ते तीन दिवसात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग स्विकारणार आहोत. आपणाकडून जर कायदेशीर कारवाई झाली नाहीतर आम्‍ही न्यायालयामध्‍ये शेतक-यांची संगनमताने फसवणूक झाली आहे अशी याचिका दाखल करणार आहोत. तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील साखर कारखान्याना ऊस दर जाहीर करण्याचे आदेश द्यावेत. चालू वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उताऱ्यानुसार दर देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला आहे.

हा निर्णय शेतकऱ्यांच्या तोटयाचा तर कारखांदारांच्या फायद्याचा आहे. कारण चालू वर्षी किती साखर उतारा मिळणार हे हंगाम संपल्या शिवाय कळणार नाही. त्यामुळे कोणता कारखान्याचा ऊस दर किती मिळणार हे समजनार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा ऊस दर देणाऱ्यां कारखान्याला ऊस देण्याचे स्वप्न भंगणार आहे. मागील काही वर्षापासून जास्तीचा साखर उतारा जास्तीचा दर त्यामुळे शेतकरी त्याच कारखान्याला ऊस घालत होता. यामुळे ऊस दर जाहीर होणे शेतकऱ्यांच्या साठी महत्वाचे ठरणार आहे. जास्तीचा ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्या ला त्यामुळे शेतकरी आपला ऊस पाठवू शकतो. एफआरपी चे तुकडे करण्याचा कायदा साखर कारखाने तंतोतद पाळतात परंतु दर जाहीर करण्याचा कायदा मात्र पाळला जात नाही.

टॅग्स :crimekaradSugar Factory