Satara : मोरणा विभागात वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

आटोली ते पांढरपाणी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत शुक्रवारी वनरक्षक अवधुत पिसे यांनी गळफास लावुन आत्महत्या केली
crime news
crime newscrime news

पाटण : मोरणा विभागातील पांढरपाणी येथील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत वनरक्षक अवधुत सुभाष पिसे वय-३५ सध्या रा. मोरगिरी मुळराहणार माधवनगर सांगली याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही.

crime news
IPL 2022 : मेगा लिलाव अन् खेळाडूंच्या रिटेन संदर्भात सर्व काही

याबाबत पाटण पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, ढेबेवाडी वन्यजीव क्षेत्रातील नियत क्षेत्र आटोली परिसरातील आटोली ते पांढरपाणी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील वन्यजीव विभागाच्या संरक्षण कुटीत शुक्रवारी वनरक्षक अवधुत पिसे यांनी गळफास लावुन आत्महत्या केली. एका सहकाऱ्याने त्यांना शनिवारी कामावर जाण्यासाठी फोन केला असता त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. तो कामावर पुढे गेला असेल म्हणुन सदर कर्मचारी संरक्षण कुटीकडे गेला असता त्यास आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

crime news
Rain : राज्यात मुंबई, ठाण्यासह पुण्यात 2 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा!

घटनेची माहिती प्रथम वरिष्ठांना पाटण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व रात्री उशीरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अवधुत पिसे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद संदीप अनिल जोपळे, वनक्षेत्रपाल, वन्यजीव हेळवाक यांनी दिली असुन अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र पगडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com