महाबळेश्वरात 16 वर्षांनंतर फुलली 'सुपुष्पा'

काही प्रजातींना विशिष्ट वर्षांनंतरच फुलांचा बहर येतो. ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे.
महाबळेश्वरात 16 वर्षांनंतर फुलली 'सुपुष्पा'
महाबळेश्वरात 16 वर्षांनंतर फुलली 'सुपुष्पा'esakal
Summary

काही प्रजातींना विशिष्ट वर्षांनंतरच फुलांचा बहर येतो. ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे.

ढेबेवाडी (सातारा) : तब्बल १६ वर्षांनंतर फुलांचा बहर येऊन नंतर मृत होणाऱ्या 'कारवी'वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि अविस्मरणीय 'सुपुष्पा' महाबळेश्वरमध्ये बहरली असून, तेथे तिचे परागीभवन व्यवस्थित होऊन पुढेही अस्तित्व कायम ठेवण्यासाठी वन विभागाने 'कॅसल' व 'सावित्री' हे दोन पॉइंट दहा दिवसांसाठी बंद ठेवले आहेत.

महाबळेश्वरात 16 वर्षांनंतर फुलली 'सुपुष्पा'
'आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला'; ढेबेवाडी 'आरोग्य'त 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

सह्याद्रीच्या डोंगररांगात आढळणाऱ्या 'कारवी'च्या अनेक प्रजाती प्रदेशनिष्ठ आणि अनोख्या सौंदर्याने जगभर प्रसिद्ध आहेत. त्यातील काही प्रजातींना विशिष्ट वर्षांनंतरच फुलांचा बहर येतो. ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे. तब्बल १६ वर्षांनंतर फुलांचा बहर येऊन नंतर मृत होणाऱ्या ‘कारवी’ वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय सपुष्पा (पिचकोडी) सध्या महाबळेश्वरमध्ये बहरली असून, त्यामुळे महाबळेश्‍वरातील निसर्ग सौंदर्यात आणखी एका मनमोहक नजाऱ्याची भर पडली आहे. 'कॅसल' व 'सावित्री' पॉइंटजवळ साधारणपणे आठवडाभरापासून सपुष्पाच्या बहराला सुरुवात झालेली आहे. आणखी १५ दिवस तरी बहर कायम राहील. त्यानंतर मात्र त्याचे रूपांतर बियांमध्ये होईल. १६ वर्षांनंतर ही वनस्पती मृत होते. त्या जागी बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. मात्र, त्यासाठी सुपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे अत्यंत महत्त्वाचे असते.

महाबळेश्वरात 16 वर्षांनंतर फुलली 'सुपुष्पा'
साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

सध्या त्या ठिकाणी मधमाशी, फुलपाखरे व इतर घटक आपापल्या परीने परागीभवन करताना दिसत असले, तरी पर्यटकांची गर्दी व गोंगाटामुळे परागीभवनात अडथळे येत असल्याने महाबळेश्वर वन परिक्षेत्रमार्फत ‘कॅसल’व ‘सावित्री’हे दोन पॉइंट दहा दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर वनवृतचे उपजीविका तज्ज्ञ डॉ. योगेश फोंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘जैव विविधता संवर्धनाचा भाग म्हणून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन आणि साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.’’

दरम्यान, मधमाशा, फुलपाखरे व अन्य किटकांमार्फत ‘सुपुष्पा' वनस्पतीच्या फुलांचे व्यवस्थित परागीकरण होण्यासाठी मुख्य वनसंरक्षक डॉ. योगेश फोंडे यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरचे परिक्षेत्र वनाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत आणि संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती आदींचा मोहिमेत सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com