घरकुल योजनेतील अपात्रांचा फेर सर्व्हे करा; जयकुमार गोरे

आमदार जयकुमार गोरे; भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून जलजीवन मिशनचेही सर्वेक्षण हवे
Survey the ineligible persons in Gharkul scheme Jayakumar Gore satara
Survey the ineligible persons in Gharkul scheme Jayakumar Gore sataraesakal

दहिवडी : घरकुल योजनेत अनेक पात्र लाभार्थ्यांचा समावेश नाही. ते का अपात्र झालेत, हे त्यांनाच माहीत नाही. त्यामुळे घरकुल योजनेतील अपात्रांचा फेर सर्व्हे करा, अशी सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी केली. भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून जलजीवन मिशनचा सर्व्हे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

माण पंचायत समिती आयोजित महाआवास अभियान ग्रामीण २०२२ तालुकास्तरीय कार्यशाळा व जलजीवन मिशन कार्यशाळेनिमित्त येथील डंगारे मंगल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शिंदे, सभापती रंजना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, अपर्णा भोसले, तानाजी काटकर, बबन वीरकर, दादासाहेब काळे, बाबासाहेब हुलगे आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘‘तालुक्यातील ९५ गावांत ७५६९ लाभार्थ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. मात्र, त्यातील १५३६ लाभार्थी ऑनलाइन अपात्र ठरले आहेत. सर्वेक्षण करताना ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामसभेला दाखविले का? २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळाले पाहिजे, अशी केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. एखाद्या गावात लाभार्थी नाही, असा अहवाल आपण दिला तर पुढे मोठी अडचण निर्माण होईल. अपात्र लाभार्थ्यांची यादी घेऊन १५३६ ऑनलाइन अपात्र झाले आहेत. त्यांचा व जे यादीत नाहीत, त्यांचा फेरसर्व्हे करावा लागेल.’’सर्जेराव पाटील म्हणाले,‘‘ १७ ग्रामपंचायतींमध्ये अपील आली होती. तेथे फेरसर्व्हे केला आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने घरकुलाचा लाभ घेतला असेल व ऑनलाइन नोंदणी करताना ते एकत्र दाखवले असेल तर त्यांना परत मिळणार नाही. त्याऐवजी रेशन कार्ड वेगळे असेल तर लाभ मिळेल.’’

जलजीवन मिशनबद्दल आमदार गोरे म्हणाले,‘‘ शाश्वत, शुध्द व घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. लोकसंख्या हा या योजनेतील महत्त्‍वाचा निकष आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी या योजनेचा फेरआढावा घ्यावा. संबंधित यंत्रणेनेही भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून सर्व्हे करावा.’’या वेळी उपस्थित सरपंच, ग्रामस्थांनी घरकुल योजनेतील तसेच जलजीवन मिशनमधील अडचणी सांगितल्या. अधिकाऱ्यांनी या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार गोरे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com