चित्रीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा

उदयनराजे; लालमहाल ही वास्तू नाच-गाण्याच्या चित्रीकरणाची जागा नव्हे
Udyanraje Bhosale
Udyanraje BhosaleSakal

सातारा - लालमहाल ही वास्तू नाच-गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरणास आमचा विरोध नाही. मात्र, या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या संदर्भात खासदार उदयनराजेंनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून, या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, ही वास्तू सिनेमातील नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही, याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे होते. ज्यांनी कोणी हे चित्रीकरण केले, त्यांनी ते सिनेमात वापरू नये, तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.

मुळात ही वास्तू पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असून, या चित्रीकरणासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे, त्याचबरोबर जे चित्रीकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com