esakal | तमाशा फडमालकांचं जीणं झालंय हराम; दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद
sakal

बोलून बातमी शोधा

तमाशा फडमालकांचं जीणं झालंय हराम; दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद

खासगी सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने फडमालकांचे जीणं हराम झाल्यासारखी स्थिती झाली आहे.

तमाशा फडमालकांचं जीणं झालंय हराम; दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): तमाशा ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे. ती कला जपून पोटाची खळगी भरावी, यासाठी तमाशा फडमालक खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन फड उभा करतात. व्यवसायातून मिळालेल्या पैशातून दरवर्षी ते खासगी सावकारांचे कर्ज भागवतात. अनेक वर्षांपासूनचा हा रिवाज कोरोना महामारीमुळे मोडला. दोन वर्षे कार्यक्रम नसल्याने फडमालकांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज त्यांच्याच अंगावर फिरले आहे. ते पैसे भागवण्यासाठी फडमालकांकडे दमडीही नाही. त्यातच खासगी सावकारांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने फडमालकांचे जीणं हराम झाल्यासारखी स्थिती झाली आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

विनोद, वगनाट्यातून जनजागृती करत तमाशा ही कला जिवंत ठेवण्याचे काम तमाशा फडमालकांनी गेली अनेक वर्षे केले आहे. त्यासाठी त्यांना दरवर्षी खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. फडमालकांकडे तारण देण्यासाठी काहीच नसल्याने त्यांना बॅंका, पतसंस्था कर्जासाठी उभ्याही करत नाहीत. परिणामी त्यांना तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी नाईलाजाने खासगी सावकारांच्याच दारात जावे लागते. दरवर्षी यात्रांच्या हंगामात फड सुरू करण्यासाठी त्यांना सावकारांकडून पैसे घ्यावे लागतात. ते पैसे कलाकारांना अंगावर उचल देणे, फड उभा करणे यासाठी ते वापरतात. यात्रा-जत्रांतील कार्यक्रमांतून मिळणाऱ्या पैशातून वजावट करून फडमालक खासगी सावकारांची देणी भागवतात.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

दरवर्षीचे हे रहाटगाडगे गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. मात्र, मागील वर्षापासून याला 'ब्रेक' लागला आहे. मागील वर्षी कोरोना महामारीचे संकट आले. हा संसर्गजन्य आजार असल्याने संपर्क टाळणे हाच त्यावर उपाय आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा-यात्रांवर, कार्यक्रमांवर बंदी घातली. त्याचा मोठा फटका हातांवर, कलेवर पोट असणाऱ्यांना बसला आहे. दोन वर्षांपासून तमाशांचे कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर मोलमजुरी करायची वेळ आली आहे. त्यातच ज्या फडमालकांनी खासगी सावकारांचे कर्ज घेतले होते, ते भागवायचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा: कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक;पाहा व्हिडिओ

खासगी सावकारांचे कर्ज कोरोना महामारीमुळे फडमालकांकडे थटले आहे. दोन वर्षे कार्यक्रम नसल्याने फडमालकांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज त्यांच्याच अंगावर फिरले आहे. ते पैसे भागवण्यास फडमालकांकडे सध्या दमडीही नाही, अशी स्थिती आहे. त्यातच खासगी सावकारांनीही त्यांचे पैसे मिळावे, यासाठी त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे फडमालकांचे जीणं हराम झाल्यासारखी स्थिती झाली आहे.

हेही वाचा: सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वरसह 'या' पालिकांसाठी लवकरच 'रणधुमाळी'

"तमाशा फडमालक खासगी सावकारांकडून फड उभा करण्यासाठी पैसे घेतात. त्यांचे पैसे देणेही फडमालकांना बांधिल आहे. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे फडमालकांकडेही पैसे नाहीत. त्यामुळे सावकारांनी थोडा धीर धरावा."

- संभाजीराजे जाधव, अध्यक्ष, तमाशा फडमालक संघटना

loading image
go to top