उंब्रजकरांच्या कचऱ्यातून तारळी नदी प्रदूषित

संतोष चव्हाण
Wednesday, 30 September 2020

किमान टनभर कचऱ्याची दररोजची पडणारी भर नदी, पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही हानिकारक ठरत आहे. येथील तारळी नदीपात्रालगत पुलानजीक ग्रामपंचायतीने कचरा डेपो केला आहे. कचरा डेपोवर सर्व प्रकारचा कचरा आणून ओतला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तेथे मोकाट जनावरे, भटकी कुत्री वावरतात. ग्रामपंचायत गावातील कचरा गोळा करून तारळी नदीकडेच्या कचराडेपोत टाकते. तो कचरा नदीपात्रात मिसळत आहे.

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रजकरांचा रोजचा तब्बल टनभर कचरा तारळी नदीलाच थेट प्रदूषित करत आहे. तारळी नदीलगत डंपिंग स्टेशन केले आहे. त्यामुळे तेथे उघड्यावर पडलेल्या दहा ते बारा फुटांपेक्षा जास्त उंचीचे कचऱ्याचे ढीग नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आणत आहेत. त्याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळही दुर्लक्ष करत आहे. त्या कचऱ्याच्या पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे उंब्रजसह परिसरात रोगराईचा सामना करावा लागत आहे. 

किमान टनभर कचऱ्याची दररोजची पडणारी भर नदी, पर्यावरणासह मानवी आरोग्यालाही हानिकारक ठरत आहे. येथील तारळी नदीपात्रालगत पुलानजीक ग्रामपंचायतीने कचरा डेपो केला आहे. कचरा डेपोवर सर्व प्रकारचा कचरा आणून ओतला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. तेथे मोकाट जनावरे, भटकी कुत्री वावरतात. ग्रामपंचायत गावातील कचरा गोळा करून तारळी नदीकडेच्या कचराडेपोत टाकते. तो कचरा नदीपात्रात मिसळत आहे. त्यातून नदीचे पाणी अस्वच्छ होत आहे. 

निधीअभावी घरकुलांचे स्वप्न राहिले कागदावर!

नदीपात्रातच उंब्रजची पिण्याची पाणीपुरवठा जॅकवेल आहे. त्यामुळे कचरा पिण्याच्या पाण्यातही मिसळत असल्याने उंब्रजरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. नागरिकांना कचऱ्यापासून होणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष कधी देणार, असा सवाल नागरिक करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tarli River Is Polluted By Garbage Satara News