पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला फिरायला निघालात? मग हे वाचाच

अभिजीत खूरासणे | Friday, 8 January 2021

ऑक्‍टोबर ते जून महिन्यापर्यंत महाबळेश्‍वर, पाचगणी व परिसरात राज्य व राज्याबाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. या ऐन मोसमात टॅक्‍सी दरवाढ झाल्याने पर्यटकांच्या खिशाला चाट बसणार आहे.

सातारा : महाबळेश्‍वर व पाचगणी येथील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी प्रवासी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टॅक्‍सी भाड्यामध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 20 टक्के दरवाढ केली आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी, तापोळा, प्रतापगड, वाई या पर्यटनस्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात. प्रवासी व टॅक्‍सीचालकांमधील वाद टाळण्यासाठी 2013 पासून पॉइंट टू पॉइंट टॅक्‍सीचे भाडे ठरवून देण्यात आले आहे. परंतु, 2013 ते 2020 या कालावधीत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नव्हती.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा 

सद्य:स्थितीत पेट्रोल-डिझेलची दरवाढ, वाढती महागाई, कोरोनाच्या काळात बंद असलेला व्यवसाय, विमा हप्त्यामधील वाढ, सुट्टे भागांच्या किमतीत वाढ आदींमध्ये झपाट्याने दर वाढल्यामुळे टॅक्‍सी व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने टॅक्‍सी दरपत्रकात वाढ करण्याबाबतचे निवेदन काही दिवसांपूर्वी महाबळेश्‍वर-पाचगणी टॅक्‍सी संघटनांनी दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन नुकतीच नवीन दरवाढ लागू झाली आहे. ऑक्‍टोबर ते जून महिन्यापर्यंत महाबळेश्‍वर, पाचगणी व परिसरात राज्य व राज्याबाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.

उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; अभी के अभी म्हणत उडवली पुन्हा काॅलर 

Advertising
Advertising

ऐन मोसमात टॅक्‍सी दरवाढ झाल्याने पर्यटकांच्या खिशाला चाट बसणार आहे. दरम्यान तब्बल सात वर्षानंतर भाडेवाढ झाली असून पर्यटकांनी टॅक्सी संघटनेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेले नवे दर पुढील प्रमाणे -ः

 • महाबळेश्‍वरपासून प्रतापगड दर्शन 1200 रुपये.
 •  
 • महाबळेश्‍वर दर्शन 660 रुपये
 •  
 • महाबळेश्‍वरपासून पाचगणी दर्शन 840 रुपये
 •  
 • पाचगणी ते वाई 840 रुपये
 •  
 • महाबळेश्‍वरपासून तापोळा दर्शन 1200 रुपये
 •  
 • शहरातील इतर कोणतेही दोन किलोमीटपर्यंत स्थानिक पॉइंट 100 रुपये
 •  
 • पाचगणीपासून प्रतापगड दर्शन 1680 रुपये
 •  
 • पाचगणीपासून महाबळेश्‍वर दर्शन 1440 रुपये
 •  
 • पाचगणी दर्शन 640 रुपये
 •  
 • पाचगणीपासून वाई दर्शन 1080
 •  
 • पाचगणीपासून तापोळा दर्शन 1800
 •  
 • टेबल लॅंड 120 रुपये.
 •  

नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर 

Edited By : Siddharth Latkar