आपलं मत लोकशाहीसाठी अमूल्य; कोरोनाची काळजी घेऊन मतदान करा : थोरात

यशवंतदत्त बेंद्रे
Sunday, 22 November 2020

मतदान केंद्रावरील व्यवस्था व कोरोनाचा पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आवश्‍यक सूचना केल्या. आपले मत लोकशाहीसाठी अमूल्य तर आहेच; पण मजबूत लोकशाहीचा आधार देखील आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी बाहेर पडावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार थोरात यांनी केले.

तारळे (जि. सातारा) : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होत आहे. कोरोनाची काळजी घेऊन मतदान करा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत थोरात यांनी केले. मतदान केंद्र पाहणी व त्याचे व्यवस्थापन संदर्भाने येथील छत्रपती विद्यालयात पाटणचे प्रभारी तहसीलदार थोरात यांनी येथे भेट दिली. 

मतदान केंद्रावरील व्यवस्था व कोरोनाचा पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आवश्‍यक सूचना केल्या. आपले मत लोकशाहीसाठी अमूल्य तर आहेच; पण मजबूत लोकशाहीचा आधार देखील आहे. मतदान करण्यासाठी मतदारांनी बाहेर पडावे, असे आवाहनही केले. 

पदवीधरांच्या बेकारीला भाजपच जबाबदार : जयंत पाटील

सध्या कोरोनाचा प्रसार मर्यादित आहे. मात्र, सर्वच स्तरातून दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने मतदान प्रक्रिया वेळी अधिकारी व मतदारांनी पुरेशी काळजी देखील घेणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी मतदार जनजागृती व कोरोनाबाबतच्या जनजागृती पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले. या वेळी येथील तलाठी अबिदा सय्यद यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar In Charge Thorat Inspected The Polling Station At Tarle Satara News