esakal | कऱ्हाडला मोकळ्या जागांवर कर आकारणी! पालिकेच्या तिजोरीत पडणार चार कोटींची भर
sakal

बोलून बातमी शोधा

karad corporation

पालिकेच्या मासिक बैठकीत तो विषय मंजूर झाला की, त्याची त्वरित कर आकारणीची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

कऱ्हाडला मोकळ्या जागांवर कर आकारणी

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): पालिकेच्या जनरल फंडात ठणठणात असल्यामुळे पालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पालिकेने उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका शहरातील मोकळ्या जागा, लेआउट करून ठेवेलल्या प्लॉटवर कर आकारणी करणार आहे. त्या कर आकारणीतून तब्बल चार कोटींच्या निधीची भर पालिकेच्या तिजोरीत पडणार आहे. या मोकळ्या जागांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. पालिकेच्या मासिक बैठकीत तो विषय मंजूर झाला की, त्याची त्वरित कर आकारणीची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : झटापटीनंतर रावण गँगचे चौघे जेरबंद; पोलिसांची धाडसी कारवाई

पालिकेच्या जनरल फंडात शिल्लक केवळ सव्वातीन लाख तर देणी १३ कोटींच्या घरात आहेत. पालिकेकडे पैसेच नसल्याने ठेकेदारही कामे घेईनात, अशी स्थिती आहे. पालिकेच्या मासिक सभेत त्यावर चर्चा झाल्याने तो विषय सध्या गाजतो आहे. या आर्थिक टंचाईला जबाबदार घटकांवर चर्चा करण्यापेक्षा गटनेत्यांनी एकत्रित येऊन त्या आर्थिक संकटावर मात करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार विकासकामांचा भार जनरल फंडावर टाकला जाणार नाही, त्याबाबत गटनेत्यांत एकमत झाले. तरीही पालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी पालिका मार्ग शोघते आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका मोकळ्या जागांवर कर आकारणी करणार आहे.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेची तोकडी शिल्लक, कोटीत देणी!

पालिकेच्या मासिक बैठकीत त्याला मंजुरी मिळाली की, त्वरित पालिका त्याची आकारणी करणार आहे. पालिकेच्या सर्व्हेनुसार शहरातील वेगवेगळ्या भागांत मोकळ्या जागांसहित केवळ प्लॉट करून ठेवले आहेत. त्याचा पालिकने सर्व्हे केला आहे. त्यानुसार वाखाण भाग, शिवाजी हाउसिंग सोसायटी, हद्दवाढ भाग, शहराच्या कार्वे नाका परिसरात मोकळ्या जागा, लेउटचे प्लॉट आहेत. ते प्लॉट मोकळेच पडून आहेत. मुख्य शहरात जुने प्लॉटही पडून आहेत. वर्षानुवर्षे त्या जागांवर पालिकेने कोणतीही आकारणी केलेली नाही. मात्र, पालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्या जागांच्या सर्व्हेसहित त्यावर कर आकारणीचे निर्देश दिले. त्यानुसार पालिकेने त्याचा सर्व्हे पूर्ण केला आहे. त्यावर अन्य पालिकांप्रमाणेच कर आकारणी होणार आहे. पालिकेच्या मासिक बैठकीत ठराव होईल. ठरावाची टिपण्णी दिली आहे. ठराव होताच पालिका त्या जागांवर कर आकारणी करणार आहे. त्या कर आकारणीने पालिकेच्या तिजोरीत चार कोटींच्या निधीची भर पडणार आहे.

‘‘शहरातील मोकळ्या जागा, लेआउटच्या प्लॉटवर आता कर आकारणी केली जाणार आहे. पालिकेच्या तिजोरीत त्यामुळे जवळपास चार कोटींच्या निधीची भर होऊन पालिकेला कायमस्वरूपीच उत्पन्नही मिळणार आहे.’’

- रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

loading image
go to top