सातारा : चक्क पोलिस कोठडीतून संशयित पळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

सातारा : चक्क पोलिस कोठडीतून संशयित पळाले

औंध - येथील पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केलेले संशयित आरोपी पळाले आहेत. लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली आहे. ही घटना पहाटे तीन वाजता घडली असून, गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पोलिस दल हादरले आहे. दरम्यान, पळालेल्या संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयित बीड व नगर जिल्ह्यांतील आहेत. अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज काळे या संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. संशयित दरोडेखोरांना नुकतेच गंभीर गुन्ह्यात अटक झाली होती. पोलिस कोठडीत असल्याने त्यांना लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे मात्र ताकदीच्या जोरावर दरोडेखोरांनी लॉकअपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत औंध पोलिस ठाण्यातून पलायन केले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले असून, दरोडेखोरांच्या शोधासाठी एकूण दहा पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पळालेल्या संशयितांपैकी राहुल भोसलेस वरुड-सिद्धेश्वर कुरवली परिसरातून सकाळी सातच्या दरम्यान, तर सचिन भोसलेला औंध येथील खोरी या शिवारातून सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपी शोध मोहिमेसाठी औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, तसेच जिल्ह्यातील दहा पोलिस पथके प्रयत्न करत आहेत.

लवकरच आरोपी ताब्यात घेऊ : बन्सल

तपासासाठीचे चक्रे अधिक गतिमान करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून, लवकरच सर्व आरोपी ताब्यात घेऊ, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The Suspect Escaped From The Police Cell At Aundh Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top