esakal | ज्‍योती मांढरेची साक्ष अपूर्णच ; पुढील सुनावणी 15 नोव्‍हेंबरला होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

ज्‍योती मांढरेची साक्ष अपूर्णच ; पुढील सुनावणी 15 नोव्‍हेंबरला होणार

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : धोम येथील खून सत्राप्रकरणी दाखल असणाऱ्या संतोष पोळ याच्‍याविरोधातील खटल्‍याच्‍या कामकाजादरम्‍यान आज माफीचा साक्षीदार असणाऱ्या ज्‍योती मांढरे हिची साक्ष अपूर्णच राहिली. या खटल्‍याची पुढील सुनावणी ता. १५ आणि १६ नोव्‍हेंबर या दिवशी होणार आहे.

वाई येथील मंगला जेधे यांच्‍या अपहरण आणि खू्नप्रकरणी अटक केलेल्‍या धोम येथील संतोष पोळ याने नंतरच्‍या काळात पाच खुनांची कबुली दिली होती. या कबुलीनंतर पोलिसांनी पोळ याच्‍या धोम येथील घराच्‍या पाठीमागे, तसेच पोल्‍ट्री फार्म परिसरात खुदाई करत पाच मानवी सांगाडे जप्‍त केले होते. या प्रकरणात पोळ याला ज्‍योती मांढरे हिने मदत केल्‍याचे तपासात समोर आल्‍यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली होती. न्‍यायालयीन कामकाजादरम्‍यान मांढरे हिला माफीचा साक्षीदार म्‍हणून घोषित करण्‍यात आले. पोळ याच्‍याविरोधात दाखल असणाऱ्या आरोपपत्रावरील सुनावणी आज सातारा जिल्‍हा न्‍यायालयात झाली. यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्‍वल निकम हे उपस्‍थित होते.

हेही वाचा: काय गं हे उर्वशी? तुम्हीच सांगा हिला काय म्हणायचं?

खटल्‍याच्‍या कामकाजादरम्‍यान बचाव पक्षातर्फे ॲड. श्रीकांत हुटगीकर यांनी माफीचा साक्षीदार ज्‍योती मांढरे हिला काही प्रश्‍‍न विचारले. दुपारच्‍या सत्रापर्यंत मांढरे हिची साक्ष नोंदवून घेण्‍याचे काम झाल्‍यानंतर न्‍यायालयीन कामकाज थांबविण्‍यात आले. या खटल्‍याची पुढील सुनावणी नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या १५ आणि १६ तारखेला होणार आहे.

loading image
go to top