esakal | धक्कादायक! शिंगणापूरात चाे-या; ग्रामस्थांत खळबळ

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! शिंगणापूरात चाे-या; ग्रामस्थांत खळबळ

तक्रारीच्या वेळी कागदपत्रे नसल्यामुळे तक्रार घेण्यासही टाळाटाळ होते, तर तक्रार देऊनही तपास ढम्म असल्याचे दिसत आहे. पोलिस यंत्रणेने जागे होऊन तपास करावा, अशी मागणी शिंगणापूर ग्रामस्थांतून जोर धरत आहे. 

धक्कादायक! शिंगणापूरात चाे-या; ग्रामस्थांत खळबळ

sakal_logo
By
धनंजय कावडे

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : येथे अनेक दिवसांपासून मंदिर परिसरातून दुचाकी, शिवारातून वीजपंप, शेळ्या- मेंढ्या, नवसाचे सोडलेले खोंड, पाळीव जनावरांच्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत व हैराण झाले आहेत. पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मात्र, सध्या येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

दुचाकी, वीजपंप, शेळ्या- मेंढ्या, नवसासाठी सोडलेले खोंड चोरटे लंपास करत असल्याने शिंगणापूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पोलिसी करड्या नजरेची कमतरता, तर सीसीटीव्ही शोपीस ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 2021 या नवीन वर्षात आजपर्यंत चार दुचाकी, तीन वीज पंप अन्‌ काही शेळ्या- मेंढ्या, खोंडाच्या चोऱ्या झाल्याच्या तक्रारी आहेत, तर उभ्या वाहनांतील डिझेल, पेट्रोल चोरी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तीर्थक्षेत्र असल्याने शिंगणापूर येथे पोलिस दूरक्षेत्र आहे, तर पोलिस प्रशासनाच्या सूचनेवरून शिंगणापूर ग्रामपंचायतीने चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र, एवढे सर्व असूनही पोलिस तपास ढिम्म आहे, तर अद्यापही तपासचक्रे फिरताना दिसत नाहीत. शिंगणापुरातील वाढत्या चोरीचे प्रमाण पोलिस यंत्रणेसह ग्रामस्थांना डोकेदुखी ठरत आहे. याबाबत ग्रामस्थ चर्चा करताना पोलिसी करड्या नजरेची कमतरता पडत असून, सीसीटीव्ही शोपीस आहेत का? असा सवाल करत आहेत. 


पोलिस यंत्रणा गप्प कशी? 

दरम्यान, चोऱ्या वाढत असताना पोलिस यंत्रणा गप्प कशी? असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असूनही त्याचा वापर तपासकामी का होत नाही? खूप वेळा तक्रार घेण्यापूर्वी तक्रारदाराला पोलिसांच्या अनेक शंकाकुशंकांना सामोरे जावे लागताना दिसत आहे. तक्रारीच्या वेळी कागदपत्रे नसल्यामुळे तक्रार घेण्यासही टाळाटाळ होते, तर तक्रार देऊनही तपास ढम्म असल्याचे दिसत आहे. पोलिस यंत्रणेने जागे होऊन तपास करावा, अशी मागणी शिंगणापूर ग्रामस्थांतून जोर धरत आहे. 

भाजपच्या ताब्यातील साखर कारखान्यासाठी गोळाबेरीज सुरु; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सेनेच्या साथीची अपेक्षा

शंभर वर्षांची परंपरा जपण्यासाठी यात्रा भरवणं पडलं महागात; तहसीलदारांकडून यात्रा समितीवर गुन्हा

राजकारण बाजूला ठेऊन साताऱ्याला भरघोस निधी देणार; मंत्री चव्हाणांची उदयनराजेंना ग्वाही

हारुगडेवाडीत स्फोटकांसह पोकलेन जप्त; पाटणात तहसीलदारांची धडक कारवाई

शेगावचे गजानन महाराज ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र का म्हणायचे?

Edited By : Siddharth Latkar