तीस तोळ्यांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves stole jewelery belonging to traveling lady karad

तीस तोळ्यांचे दागिने लंपास

कऱ्हाड - पनवेलहून गावी निघालेल्या प्रवासी महिलेकडील ३० तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. कऱ्हाड ते पेठ नाका प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात तीन महिलांवर गुन्हा नोंदविला आहे. सुशीला सर्जेराव कांबळे (वय ५८, रा. पनवेल, मूळ रा. नाठवडे, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः सुशीला कांबळे या पनवेलमध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. काल काही कामानिमित्त त्या पनवेलहून एसटीने गावी निघाल्या होत्या. सोबत असलेल्या पर्समध्ये त्यांनी सुमारे ३० तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते. सायंकाळी एसटी कऱ्हाड बस स्थानकात आली. त्या वेळी त्या एसटीमधून खाली उतरल्या. काही मिनिटे खाली थांबल्यानंतर त्या पुन्हा एसटीमध्ये चढल्या. एसटी कऱ्हाड बस स्थानकातून सांगलीकडे मार्गस्थ झाली. पेठ नाका येथे एसटी थांबल्यानंतर तीन महिला एसटीतून खाली उतरल्या. त्यानंतर एसटी पुढे निघाली.

दरम्यान, काही अंतरावर गेल्यानंतर ३० तोळे सोने असलेली पर्स चोरीस गेल्याचे सुशीला कांबळे यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. या पथकाने पेठ नाका येथे संशयित महिलांचा शोध घेतला. मात्र, संबंधित महिला पोलिसांच्या हाती लागल्या नाहीत. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे तपास करीत आहेत.

Web Title: Thieves Stole Jewelery Belonging To Traveling Lady Karad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top