esakal | हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा
sakal

बोलून बातमी शोधा

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा

सणानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात असलेल्या सातारकरांनी स्वगृही जरूर यावे. पण, आपल्यामुळे कोरोना आपल्या घरात व गावात पोचू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी प्रत्येकाने घेतल्यास आपण कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो.

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, सध्या तीन हजार 405 रुग्ण उपचार घेत आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे बेड कमी पडू लागले आहेत. आता गणेशोत्सवानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यांतून सणासाठी सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एक ऑगस्टपासून आतापर्यंत 20 हजारांवर अधिक लोक जिल्ह्यात आलेले आहेत. आणखी सुमारे 35 ते 40 हजार सातारकर जिल्ह्यात परतण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांनी आपल्यासोबत कोरोना येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनामुक्त गणेशोत्सव साजरा करू शकणार आहोत.
अध्यक्ष... बाप्पांचा उत्सव जवळ आलाय, हे वाचा 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाबंदी असूनही लपुनछपुन येणाऱ्यांमुळे साताऱ्यात संसर्ग वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका पाटण, कऱ्हाड, जावळी व वाई तालुक्‍याला बसला आहे. तसेच माण, खटावमध्येही रुग्ण सापडले. पण, आता गणेशोत्सवासाठी बाहेरच्या जिल्ह्यांत काम, व्यवसाय व नोकरीनिमित्ताने असलेले सातारकर पुन्हा घरी येण्यास सुरवात झाली आहे. जिल्हाबंदी असली तरी ऑनलाइन परवानगी काढून कुटुंबे आपापल्या मूळ गावी येऊ लागली आहेत. पण, त्यासोबतच लपुनछपुन येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने कडक उपाययोजना केलेल्या असल्या तरी सणासाठी येणाऱ्यांना अडविता येत नसल्याने काहीजण खुश्‍कीच्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. यामध्ये पुणे, मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. बाहेरच्या गावी काम, व्यवसाय व नोकरीनिमित्त असलेल्या सातारकरांनी स्वगृही येऊ नये असे नाही. पण, जे लोक विनापरवानगी येत आहेत, अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या येण्यामुळे आपल्या कुटुंबासह गाव, शहरासह कोरोनाचा धोका होऊ शकतो, हे ओळखून प्रत्येकाने काळजी घेऊन आपली तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश केला पाहिजे. तसेच आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार किमान सात ते दहा दिवस होम क्वारंटाइन झाले पाहिजे. तरच आपण कोरोनाचा संसर्ग रोखू शकणार आहे.

...म्हणून मुख्याधिकारीपदी अभिजित बापट पुन्हा साताऱ्याला मिळाले  

आतापर्यंत ई-पासच्या माध्यमातून अडीच लाख लोक जिल्ह्यात परतल्याची शासकीय दप्तरी नोंद आहे. प्रत्यक्षामध्ये पाच लाखांपेक्षाही अधिक लोक आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ज्या गावांना कोरोनाचा संसर्गही नव्हता, अशा गावांतही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी बेड कमी पडू लागल्याने नव्याने वाढणाऱ्या रुग्णांवर उपचारांत अडथळे येणार आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेवरही ताण पडणार आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले तसेच त्यांच्या निकट सहवासीतांनाही संसर्ग होत असल्याने दररोज बाधितांचा आकडा दोनशेच्यावर जात आहे. चाचणीचे प्रमाण वाढविल्याने बाधित रुग्णसंख्या वाढत असली तरी यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, बाहेरून आलेल्यांनी "होम क्वारंटाइन'गांभीर्याने न पाळणे या महत्त्वाच्या त्रुटी आहेत.

CoronaUpdate : तुम्ही पॉझिटीव्ह की निगेटीव्ह, आता साताऱ्यातच समजणार

मागील काही महिन्यांची आकडेवारी पाहता, एप्रिल ते मे महिन्यांत जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या 200 ते 800 पर्यंत होती. तर मे महिन्यानंतर ती वाढून दोन हजारांवर गेली आहे. मे महिन्यात 12 तारखेला 8 हजार 877, 14 तारखेला 12 हजार 432 तर 15 तारखेला 15 हजार 023 जण साताऱ्यात आल्याचे दिसते. पण, त्यानंतर जून, जुलैमध्ये हा आकडा कमी झाला. तर ऑगस्टमध्ये एक तारखेपासून आतापर्यंत सुमारे 20 हजारांहून अधिकजण ई-पासच्या माध्यमातून जिल्ह्यात आले आहेत.

 Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे आतापासूनच बाहेरच्या जिल्ह्यातील सातारकरांनी आपल्या मूळगावी परतण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण पाटण, जावळी, महाबळेश्‍वर, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, वाई तालुक्‍यांतील असणार आहे. सणानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात असलेल्या सातारकरांनी स्वगृही जरूर यावे. पण, आपल्यामुळे कोरोना आपल्या घरात व गावात पोचू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी प्रत्येकाने घेतल्यास आपण कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. 

कोणता आहे हा भयानक आ़जार हाता पायांना येतेय सूज

एक ऑगस्टपासून पासच्या माध्यमातून जिल्ह्यात आलेले नागरिक

एक - 2,960, दोन 2,404, तीन -1,694, चार-3,370, पाच-3,222, सहा-1,907, सात -2,120, आठ- 2,264, नऊ 1,659, दहा 1,779, अकरा 1,460. 

तालुकानिहाय जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या 

कऱ्हाड 39,128, कोरेगाव 16,664, खटाव 22,194, खंडाळा 12,161, जावळी 12,545, पाटण 22,331, फलटण 16,502, महाबळेश्‍वर 12,621, माण 17,931, वाई 19,007, सातारा 55,595. 

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top