कोयना धरण 71.55 टीएमसी भरले; पावसाचा जोर ओसरला

koyna_dam
koyna_dam

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये आज शनिवार (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण 71.55 टीएमसी इतका पाणी साठा आहे. धरणामध्ये एकूण 73.18 टीएमसी इतका पाणी साठा होईल, तेव्हा पाणी पातळी सहा वक्रद्वारा पर्यंत पोहोचेल.

याचा अर्थ पाणी सांडवा माथ्यापर्यंत पोहोचेल. कदाचित आज (शनिवार) किंवा उद्या (रविवार) ही 73.18 टीएमसीची पातळी गाठली जाईल. सध्या कोणत्याही प्रकारे धरणातून विसर्ग सोडण्याचे नियोजन नाही .तरी धरण परिचालन सूचीनुसारच पाण्याचा साठा व आवक विचारात घेऊन धरणातून विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. 

विसर्ग सोडण्यापूर्वी सर्वाना पूर्व कल्पना देऊनच सोडला जातो. सध्या कोयना धरणात मागील काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी आहे. तरी कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती कुमार पाटील, कार्यकारी अभियंता,कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com