कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विलगीकरण कक्षाची गरज : सहकारमंत्री पाटील

Minister Balasaheb Patil
Minister Balasaheb Patilesakal

उंब्रज (सातारा) : ग्रामीण भागात कोरोनाने (Coronavirus) हात-पाय पसरले असून कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची (Quarantine) गरज आहे. उंब्रजचा विलगीकरण कक्ष (Quarantine centre) रुग्णांना दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी व्यक्त केला. (To Stop Spread Of Coronavirus Must Be Quarantined Requested By Minister Balasaheb Patil Satara Marathi News)

Summary

ग्रामीण भागात कोरोनाने हात-पाय पसरले असून कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची गरज आहे.

शिवडे येथील संत निरंकारी सत्संग भवनात रोटरी क्लब, ग्रामपंचायत उंब्रज, ग्रामपंचायत शिवडे, शिवभक्त प्रतिष्ठान, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन आणि संत निरंकारी सत्संगाच्या संयुक्त विद्यमाने 50 बेडचा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ आबासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या विनिता पलंगे, सोमनाथ जाधव, संग्रामसिंह पलंगे, डॉ. संजय कुंभार, डॉ. दिनेश गायकवाड, डॉ. ‌सुनिल कोडगुले, डॉ. हेमंत पाटील, भारती मदने यांच्यासह रोटरी, शिवभक्त प्रतिष्ठान आणि संत निरंकार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Minister Balasaheb Patil
साताऱ्यात लशीअभावी लसीकरण मोहीम ठप्प; जिल्ह्यात महिनाभरापासून तुटवडा

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड (Assistant Inspector of Police Ajay Gorad) यांनी कोरोना कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसूल करण्यात आलेल्या दोन लाख चार हजार 400 रुपयांच्या दंडाची रक्कम पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी ती रक्कम सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, ग्रामपंचायत सदस्यांकडे सुपूर्द केली. डॉ. सुनिल कोडगुले यांनी प्रास्ताविक केले.

To Stop Spread Of Coronavirus Must Be Quarantined Requested By Minister Balasaheb Patil Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com