esakal | Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद

बोलून बातमी शोधा

Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद}

सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकही सज्ज आहेत. ठिकठिकाणी आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी- महाबळेश्वर सज्ज झाले असून, सलग सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुटीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे. दरम्यान प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटतनाच पर्यटकांना शेतात जाऊन स्ट्राॅबेरी खाण्यात दंग असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे.
 
पाचगणी येथील प्रसिद्ध टेबललॅंड पठारावर घोडेसवारी व घोडागाडीतून रपेट मारण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक कुटुंबीयांसह आनंद घेत आहेत. महाबळेश्‍वरला नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी होत आहे. घोडे सवारी, अंगाला झोंबणाऱ्या थंडीत गरमागरम मक्‍याचे कणीस, तर काही हौशी पर्यटक आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा
 
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वरमध्ये दर वर्षी विविध हंगामांत लाखो पर्यटक भेटी देत असतात; परंतु या वर्षी पर्यटननगरी महाबळेश्वर- पाचगणी या दोन्ही शहरांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सुमारे सात महिने पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले होते. राज्य सरकारने पर्यटनस्थळावरील बंदी उठवल्याने या दोन्ही गिरिस्थानावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकात आनंदाचे वातावरण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होत आहेत. महाबळेश्वर-पाचगणी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. येथे पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दोन्ही पालिकांकडून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकही सज्ज आहेत. ठिकठिकाणी आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा

प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असतानाच भिलार, पाचगणी या ठिकाणी स्ट्राॅबेरीच्या शेतात पर्यटक कुटुंबियांसमवेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पांगारी गावचे सरपंच संदीप पांगारे म्हणाले यंदा काेराेनाच्या संकटामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. आम्ही पर्यटकांना शेतात नेऊन स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद देत असलाे तरी त्यातून त्यांच्या लहान मुलांना प्रत्यक्ष फार्म कसे असते. तेथे काय चालते हे पाहता येत असल्याने त्याचा आनंद आम्हांला हाेता. एस कुमार हे पर्यटक म्हणाले हमे या पे बहाेत अच्छा लगा, स्ट्राॅबेरी बहाेत मिठी है. बच्चे कंपनी एन्जाॅय कर रही है. उन्हे या पे सिखना भी मिल रहा है. 

कदमांचा प्रामाणिकपणा; बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडलेले सोन्याचे दागिने, पैसे केले परत

दरम्यान पाचगणीच्या बाजारपेठेत सध्या स्ट्राॅबेरीचा दर 300 रुपये प्रति किलाे आहे. हा दर आणखी काही दिवस असेल. शेतावर जाऊन स्ट्राॅबेरी खाण्यासाठीचा दर 350 ते 400 रुपये प्रति किलाे आहे. सिझननंतर दर 250 रुपयांपर्यंत येईल असे विक्रेत्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar