रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा

सिद्धार्थ लाटकर | Tuesday, 19 January 2021

रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशूपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.

सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी (ता. 18) सकाळी अचानक पर्यटकांना महाकाय रानगव्यांचे दर्शन झाले. पर्यटकांनी लांबूनच त्यांचे वाहन उभे करून रानगव्यांचे छायाचित्र घेतले. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छायाचित्र टिपले.

सातारा शहराच्या नजीक असलेले कास पठार हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील तसेच राज्यातील खूप पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेला दिसतो. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मीळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे. बैलकुळातील गवा हा सर्वात मोठा प्राणी असून कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी  अनेक वेळा पारंबेफाटा ते एकीव या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं; परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो, या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड असते.

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

Advertising
Advertising

निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांच्या वारंवार झुंडी दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसत आहे. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. गेल्या एक-दोन महिन्यांत कास पठार परिसरात महाकाय रानगव्यांचे अनेकांनी वारंवार दर्शन घेतले. दरम्यान अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा करू नये, तसेच दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये, त्याला चिडविण्याचादेखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात. परंतु, त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे असेही ग्रामस्थांनी आवाहन केले आहे. 
पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा