Video : पर्यटकांच्या ओढीने पाचगणी पुन्हा बहरले

सुनील कांबळे | Thursday, 24 September 2020

पाचगणीतील विविध व्यवसाय सुरु झाले असून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नियमाप्रमाणे दुकान व्यावसायिक रात्री सात वाजता दुकानं बंद करत आहे, दिवसा दुकानं सुरु करण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. व्यवसाय पुर्ववत सुरु असले तरी येणा-या पर्यकांचे प्रमाण तुरळक आहे. स्थानिक लोकही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत तोंडाला मास्क लावून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करत आहेत.

पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.

लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लॅंडवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. मात्र, सध्या देशावर कोरोना विषाणूचं सावट असल्याने येथील पर्यटन स्थळ काही कालावधीसाठी बंद करण्यात आले होते. गेली पाच ते सहा महिने येथील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशासनाने तेथील व्यवसायास परवानगी दिल्याने पाचगणी पुन्हा पुर्ववत होत आहे.

पाचगणी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांसह सहा बाधित

पाचगणीतील विविध व्यवसाय सुरु झाले असून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत नियमाप्रमाणे दुकान व्यावसायिक रात्री सात वाजता दुकानं बंद करत आहे, दिवसा दुकानं सुरु करण्यास प्रशासनाने मुभा दिली आहे. व्यवसाय पुर्ववत सुरु असले तरी येणा-या पर्यकांचे प्रमाण तुरळक आहे. स्थानिक लोकही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत तोंडाला मास्क लावून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करत आहेत. व्यवसायिकांनी देखील दुकाने बाहेर सॅनिटाझर ठेवली आहेत. एकंदरी, पाचगणीतील व्यवसायिकांना मुभा मिळाल्याने येथील सर्व व्यवसाय सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे येणा-या काही दिवसात येथील पर्यटन क्षेत्र बहरण्याची शक्यता आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे