कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traditional Shiva Jayanti procession city

कऱ्हाड : पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज की जय..., तुमचं आमचं नातं काय... जय भवानी जय शिवराय, जय भवानी... जय शिवाजी, कसलं वादळ... भगवं वादळ... या ना अशा घोषणांनी सारे कऱ्हाड शहर आज दणाणुन गेले. निमीत्त होते पारंपारीक शिवजयंतीनिमीत्त शहरातुन घोडे, चित्ररथ, वाद्ये, तुताऱ्यांच्या ललकारीत महिला, नागरीक, युवक, युवतींच्या उपस्थितीत दिमाखात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे.

traditional Shiva Jayanti procession city

traditional Shiva Jayanti procession city

शहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते. कोरोना नंतर दोन वर्षांनी होत असलेल्या यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा मोठा जोश दिसुन आला. येथील पांढरीच्या मारुती मंदिरापासुन सायंकाळी सातनंतर मिरवणुकीस पालखी पुजनाने हिंदु एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, मुकुंद चरेगावकर, फारुख पटवेकर, मजहर कागदी यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

मिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा परिधान करुन घोड्यावर स्वार झालेले युवक, युवती, महिला, वाद्ये, घोडी, नागरीक, महिला, तरुण- तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत हणुमानाची वेशभुषा केलेला कलाकार सहभागी झाले होते. धिप्पाड शरीयष्टीच्या हणुमानाने सर्व मिरवणुकीचे लक्ष वेधले. युवक, युवतींसह बालगोपाळांचे मिरवणुकीतील ते आकर्षण ठरले. मिरवणुक पांढरीच्या मारुती मंदिरापासुन कन्याशाळेसमोरुन, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकात नेण्यात आली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला.

आशीष शेलार, खासदार नाईक-निंबाळकर

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील एका उंच वाहनात भाजपचे विक्रम पावसकर यांच्या समवेत भाजपचे खासदार रणजितसींह नाईक-निंबाळकर, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी आमदार शेलार यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Web Title: Traditional Shiva Jayanti Procession City Also Celebrates Every Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top