मलकापुरात उड्डाणपूल पाडण्याचं काम सुरू; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, पोलिसांना शिवीगाळ I Karad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam on Malkapur Highway

मलकापुरातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या येथील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली आहे.

Karad News : मलकापुरात उड्डाणपूल पाडण्याचं काम सुरू; महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, पोलिसांना शिवीगाळ

मलकापूर : येथील उड्डाणपूल पाडण्यासाठी महामार्गावरील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली आहे; परंतु उपमार्गावर एकेरी वाहतूक केली असून, अनेक वाहने उलट्या दिशेने प्रवास करतात.

अशाच उलटा प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने ढेबेवाडी फाट्यावर पोलिसांबरोबर हुज्जत घालत अपशब्दाचा वापर केला. संबंधित दुचाकीवाल्याने अरेरावीची भाषा वापरली. या गोंधळात याठिकाणी काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

मलकापुरातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या येथील वाहतूक उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. उपमार्गावरून जाणारी वाहतूक अतिशय धिम्या गतीने सुरू असते. एसटी बस व खासगी प्रवासी बसचालकांच्या आडमुठेपणामुळे अनेक वेळेला वाहतूक कोंडी होऊन लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असतात.

ढेबेवाडी फाट्यावर उत्तरेकडे चौकातील उड्डाणपुला शेजारीच ढेबेवाडीकडून कोल्हापूरकडे जाणारास पर्यायी युटर्न मार्ग बनवण्यात आला आहे. येथील उड्डाणपुलाचे पिलर व बीम पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच पद्धतीने कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाणपूल पाडण्याची तयारी झाली आहे. वाहनधारकांनी दक्षिणेकडील बाजूच्या युटर्न मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.