Satara News : दुर्दैवी घटना! जकातवाडीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू; विहिरीत पाय धुण्यासाठी गेल्या अन् काळच धावला
सावित्रा या विहिरीत पाय धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. त्यामध्ये त्या बुडाल्या. हे निदर्शनास आल्यावर त्यांना विहिरीतून काढून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Jakatwadi Grieves as Woman Dies in Well MishapSakal
शेंद्रे : जकातवाडी (ता. सातारा) येथे पाय धूताना विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. सावित्रा विठ्ठल महाडिक (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. याबाबत योगेश गणपत महाडिक (रा. जकातवाडी) यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.