साताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली

गिरीश चव्हाण
Saturday, 31 October 2020

एक वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सर्जेराव पाटील यांनी स्वीकारला होता. या काळात त्यांनी मोक्का, तडीपारी या अस्त्रांचा प्रभावी वापर करत गुंड व त्यांच्या टोळ्या मोडून काढल्या होत्या. एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बदलीसाठीचा विनंती अर्ज केला होता. यानुसार त्यांची गुरुवारी रात्री सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली.

सातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. पाटील यांच्याबरोबरच सात अधिकारी जिल्ह्यातून बदलून गेले असून इतर ठिकाणाहून 16 पोलिस अधिकारी सातारा पोलिस दलास मिळणार आहेत. 

एक वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सर्जेराव पाटील यांनी स्वीकारला होता. या काळात त्यांनी मोक्का, तडीपारी या अस्त्रांचा प्रभावी वापर करत गुंड व त्यांच्या टोळ्या मोडून काढल्या होत्या. एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बदलीसाठीचा विनंती अर्ज केला होता. यानुसार त्यांची गुरुवारी रात्री सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली. वडूज पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सातारा पोलिस दलात पुणे ग्रामीण येथून सुरेश बोडखे, कोल्हापूर येथून संजय पतंगे हे पोलिस निरीक्षक दाखल झाले आहेत. कोल्हापूर येथून आरती नांद्रेकर, संतोष पवार, सोलापुर ग्रामीण येथून नवनाथ गायकवाड, रविंद्र तेलतुंबडे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक सातारा पोलिस दलात रुजू होत आहेत. 

महाराज, टेक केअर.. काळजी घ्या! रामराजेंचा उदयनराजेंना सल्ला

भुईंज पोलिस ठाण्याचे शाम बुवा यांची सोलापूर ग्रामीण, विकास बडवे यांची कोल्हापूर, नियंत्रण कक्षातील महेश भावीकट्टी यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. याचबरोबर सातारा पोलिस दलात सांगली येथून अनंत खाडे, इसाक चौगुले, सोलापूर ग्रामीण येथून प्रकाश उमाप, अन्वर मुजावर, कोल्हापूर येथून संतोष रोकडे, रविंद्र शिंदे, सुनील पवार, अनिल चौधरी, विजय चव्हाण, सांगली येथून सदाशिव स्वामी हे उपनिरीक्षक रुजू होत आहेत. जिल्हा दलातील अनील शिरोळे यांची कोल्हापूर, उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवराम खाडे यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात, तर शिरीष शिंदे यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers Of Police Officers In Satara District Satara News