...अन् साताऱ्यातील पंताचा गोट परिसर सुन्न झाला

...अन् साताऱ्यातील पंताचा गोट परिसर सुन्न झाला

सातारा : उरमोडी धरणाच्या जलशयात रविवारी (ता.3) दुपारी पोहायला गेलेले सातारा शहरातील पंताचा गोट परिसरातील जितेंद्र माने (वय 51) हे बेपत्ता झाले हाेते. आज (साेमवार) त्यांचा मृतदेह जलाशायत सापडला. माने यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त हाेत आहे.  

रविवारी (ता.3) उरमोडी धरणाच्या जलशयात माने हे पोहायला गेलेले हाेते. त्यांच्यासमवेत दोन मित्र हाेते. उरमोडी धरणाच्या परिसरात फिरुन झाल्यानंतर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहता येत नसल्याने ते बुडाले. परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देव, हवालदार दीपक बर्गे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या पथकाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. परंतु, मानेंचा शोध लागला नाही. 

आज (साेमवार) सकाळपासून शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स, महाबळेश्‍वर ट्रेकर्सची यांसह काही ग्रामस्थांनी उरमाेडी जलाशयात शोधकार्य सुरु केले. या शाेधकार्य पथकास जलाशयात जितेंद्र माने यांचा मृतदेह आढळला. पाेलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून सातारा येथे आणला. दरम्यान माने यांच्या बुडून मृत्यू झाल्याची माहिती समजताच सातारा शहरातील पंताचा गोट परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

सातारा : या गावातील गणेशमूर्ती मुंबईकरांच्या मखरात होणार विराजमान

पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com