भरधाव ट्रक कोल्हापुर, सांगलीच्या तपासणी नाक्यात घुसला, सहा कर्मचारी बचावले

भरधाव ट्रक कोल्हापुर, सांगलीच्या तपासणी नाक्यात घुसला, सहा कर्मचारी बचावले

कऱ्हाड : जिल्हा बंदी असल्याने सातारा जिल्ह्यात येणारी वाहन तपासणीला उभारलेल्या शेडमध्येच (तपासणी नाका) कोल्हापूरकडून येणारा ट्रक शिरला. ही घटना येथील मालखेड फाट्यावरील तपासणी नाक्यावर सकाळी नऊच्या सुमारास घडली. तेथे असलेल्या पाच ते सहा कर्मचारी प्रसंगवधान राखून तेथून पळाल्याने बचावले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाबंदी आहे. त्यामुळे कोल्हापुर व सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या  वाहनांच्या तपासणीसाठी मालखेड येथे प्रशासनाच्यावतीने तपासणी नाका उभारला आहे. येथे ये जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. पोलिस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी तेथे असतात. पोलिस व आरोग्य विभाग त्या नोंदी घेते. पोलिस वाहन थांबवून कागदपत्र तपासते. इ-पासही तपासला जातो. आजही नेहमी प्रमाणे तेथे नाक्यावर कसून तपासणी सुरू होती. पोलिस वाहन तपासत होते. सकाळी नऊच्या सुमारास कोल्हापूरच्या बाजूने एक ट्रक भरधाव आला. तपासणी नाका आहे, याची कल्पना असतानाही भरधाव आलेला ट्रक थेट शेडमध्येच शिरला. भरधाव येणारा ट्र्क पोलिसांनी दिसला होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी ओरडून शेडमध्ये बसलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना त्याची कल्पना दिली. ट्रक पाहून तेही नाका सोडून बाहेर पडले. त्यामुळे तेही बचावले.

पोवई नाक्‍यावरील 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा 

कोल्हापूरमध्ये आणखी २६ जणांना कोरोनाची बाधा....
 
नाक्यासाठी उभा केलेले शेड पूर्ण उध्वस्त झाले आहे. ट्रकचा आवाज झाल्याने सांगली व कोल्हापूरकडे जाणारी वाहने तपासणाऱ्या बाजूच्या तपासणी नाक्यावरील पोलिसांनी व नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे मदत कार्य राबवले. सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. ती सुरळीत करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यत घेतला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com