प्रतापगड’ कारखान्याचा बिगुल वाजला; 13 मार्चला होणार मतदान

कुडाळ जावळी तालुक्यातील सर्वात मोठा व एकमेव सहकारी कृषि औद्योगिक प्रकल्प असलेल्या
 साखर कारखाना
साखर कारखानाSakal

सातारा:कुडाळ जावळी तालुक्यातील सर्वात मोठा व एकमेव सहकारी कृषि औद्योगिक प्रकल्प असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आवश्यकता भासल्यास १३ मार्चला मतदान होईल, तर १४ मार्चला मतमोजणी होणार आहे.

 साखर कारखाना
'या' कारणामुळंच सोमय्यांवर शिवसैनिकांचा प्राणघातक हल्ला : उदयनराजे

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) धनंजय डोईफोडे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयातून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे.

संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये व्यक्ती व ऊस सभासद गटातून एकूण १५ जागा आहेत. त्यामध्ये कुडाळ, खर्शी सायगाव, हुमगाव, मेढा, महाबळेश्वर अशा पाच गटांतून संचालक मंडळाच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- १, महिला- २, अनुसूचित जाती व जमाती- १, विमुक्त जाती व भटक्या जमाती- १, इतर मागास प्रवर्ग- १ अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. ११ फेब्रुवारीला दाखल अर्जांची छाननी हाईल. २८ फेब्रुबारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दोन मार्चला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी चिन्हा वाटपही होईल. आवश्यक असल्यास मतदान १३ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान व १४ फेब्रुवारीला सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com