सातारा : बोगद्यामुळे अपघाताचे प्रमाण होणार कमी ; बाळासाहेब पाटील

वेळ्यात ‘खंबाटकी’तील नवीन बोगद्याची पाहणी
tunnel will reduce the number of accidents Patil
tunnel will reduce the number of accidents Patilsakal

सातारा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात नव्‍याने खोदण्‍यात येणाऱ्या सहापदरी बोगद्याचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून आज त्‍याठिकाणी सुरू असणाऱ्या कामाची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. बोगद्यामुळे अंतर कमी होण्याबरोबर वेळेची, इंधनाची, पैशाच्या बचतीबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

tunnel will reduce the number of accidents Patil
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे पुणे विभागीय प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महामार्गावर वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने खंबाटकी घाटात नव्‍याने सहापदरी बोगदा खोदाईचे काम हाती घेण्‍यात आले होते. हे काम अंतिम टप्‍प्‍यात असून त्‍यासाठीच्‍या खोदाईची सुरुवात नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन पध्‍दतीने केली होती.

tunnel will reduce the number of accidents Patil
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

त्यानंतर अंतिम टप्‍प्‍यातील खोदाई पूर्ण करून बोगदा खुला करण्‍यासाठीची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाच्‍या वतीने हाती घेण्‍यात आली. हे काम जलदगतीने सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर मुंबई तसेच पुण्याकडून सातारा तसेच कोल्‍हापूरकडे जाणारी वाहतूक वेगवान आणि सुरळीत होणार आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देत या बोगद्याचे काम सुरू असून त्‍या कामाची पाहणी श्री. पाटील यांनी केली. बोगद्यामुळे अंतर कमी होण्याबरोबर वेळेची, इंधनाची, पैशाच्या बचतीबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी पहाणीदरम्यान व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com