जिल्ह्यात सव्वादोन कोटींचा ऐवज जप्त

जिल्हा पोलिस दलाकडून ३५३ कारवाया; ३९ गुन्हे उघडकीस, १३३ संशयितांना अटक
Twelve crore Confiscated in satara district
Twelve crore Confiscated in satara districtSakal

सातारा - जिल्हा पोलिस दलाने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या निर्देशानुसार एक ते २० जून या कालावधीत विशेष मोहीम राबवत मालमत्तेसंदर्भातील ३९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर जुगार, अवैध दारूविक्री, वाळू चोरी व गुटख्याच्या ३५३ कारवाया करून तब्बल दोन कोटी ४४ लाख ४१ हजार ३२७ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अवैध धंद्यावर, तसेच मालमत्तेसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंध करण्यासाठी बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी एक ते २० जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश सर्व पोलिस उपअधीक्षक व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसांनी या कालावधीत दमदार कारवाई केली आहे. त्यानुसार या मोहिमेत जबरी चोरीचे चार, घरफोडीचे १८ व चोरीचे १७ असे ३९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. त्यामध्ये १३३ संशयितांना अटक करण्यात आली असून, ३८ लाख ३९ हजार ७१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मालमत्तेच्या गुन्ह्यांबरोबरच जुगाराच्या १३८, अवैध दारूविक्रीच्या २०४, वाळू चोरीच्या २, गांजाची एक, गुटख्याच्या तीन व इतर पाच कारवाया करण्यात आल्या. या सर्व ३५३ कारवायांमध्ये ५०१ जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन कोटी ४४ लाख ४१ हजार ३२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील कालावधीतही मालमत्तेसंदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, तसेच अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाकडून कारवाया सुरूच राहणार आहेत. मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नाकाबंदी, रात्रगस्त, कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिस यादीवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक बन्सल यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com