esakal | बंदुकीचा धाक दाखवून कऱ्हाड तालुक्यात पेट्रोल पंपावर दराेडा
sakal

बोलून बातमी शोधा

बंदुकीचा धाक दाखवून कऱ्हाड तालुक्यात पेट्रोल पंपावर दराेडा

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज (मंगळवार) सकाळी घटनास्थळी भेट दिली.

बंदुकीचा धाक दाखवून कऱ्हाड तालुक्यात पेट्रोल पंपावर दराेडा

sakal_logo
By
संतोष चव्हाण

उंब्रज (ता. कऱ्हाड) : कऱ्हाड तालुक्यातील महामार्गावरील शिवडे येथे पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून सहा अनोळख्या चोरट्यांनी फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून येवून दरोडा टाकला. सोमवारी (ता.14) मध्यरात्री सव्वा बाराच्या झालेल्या दरोड्यात पंपावरील 25 हजार रक्कमेसह दोन मोबाईल लुटून नेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर शिवडेतील एस. के. पेट्रोल पंपावर मध्यरात्री दोन दुचाकीवरुन सहाजण आले. त्यांनी त्यांच्या दुचाकीत पेट्रोल भरले. मात्र तो त्यांचा पेट्रोल टाकण्याचा बहाणा होता. कारण पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी व्यवस्थापकाला कार्ड स्वॅपचे मशिन आणण्यासाठी सांगितले. तो आत जाताच सहा जणांनी पंपावरील व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली.

Video : शिवेंद्रसिंहराजेंनी स्ववास्तूत उभारले कोविड सेंटर

कोरेगाव पंचायत समितीत बीएएमएस डॉक्‍टरांवर राेष 

पंपाच्या केबीनमध्ये नेऊन तेथील सुमारे २५ हजार रुपयांसह दोघांचे मोबाईल फोन घेऊन ते फरार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व त्यांचे सहकारी तेथे काही वेळाने पोचले. रात्री नाकाबंदीही केली होती. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. 

Video : सर्वसामान्यांशी एकरूप होणाऱ्या चंद्रलेखाराजे पंचतत्त्वात विलीन 

आज (मंगळवार) सकाळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. सहायक पोलिस निरिक्षक अजय गोरड यांनीही तपासाची सुत्रे हलवली आहेत. 


Edited By : Siddharth Latkar

loading image