पोहायला गेलेल्या दोन चिमुरडींसह महिलेवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून तिघींचा मृत्यू I Karad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Padali-Helgaon Village

शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिला व मुलींसोबत ही दुर्घटना घडली असून त्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे.

Karad News : पोहायला गेलेल्या दोन चिमुरडींसह महिलेवर काळाचा घाला; शेततळ्यात बुडून तिघींचा मृत्यू

मसूर : पाडळी-हेळगांव (ता. कऱ्हाड) येथील शेततळ्यात दोन मुली व एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल (मंगळवार) सकाळी घडली. शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिला व मुलींसोबत ही दुर्घटना घडली असून त्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे.

पाडळी इथं काल सकाळी दहाच्या सुमारास काही महिला व मुली पोहण्यासाठी शेततळ्यावर गेल्या होत्या. यावेळी पाण्यात बुडू लागलेल्या काही महिलांना वाचवण्यात यश आलं. मात्र, रागिणी रामचंद्र खडतरे (वय ४), वैष्णवी गणेश खडतरे (वय १५), शोभा नितीन घोडके (वय ३२) या तिघींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनं संपूर्ण पाडळी परिसर हादरून गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात (Masur Police Station) झाली आहे. मृत्यू झालेल्या तिघींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.