कऱ्हाड-विटा मार्गावर दोन तासाहून अधिक काळ वाहतूक जाम

Karad-Vita Highway
Karad-Vita Highwayesakal
Summary

पंढरपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हाड-विटा मार्गावर सातत्याने वाहतूक जाम होत आहे.

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड-विटा राज्यामार्गावर (Karad-Vita Highway) आज सकाळीच तब्बल दोन तासाहून अधिक काळ वाहतूक जाम झालीय. त्यामुळं वाहनांच्या मोठा रांगा लागल्या होत्या. विद्यार्थी, नोकरदार यांचे मोठे हाल झाले. त्यातच येणाऱ्या पावसातही अनेकांना भिजावं लागलं.

पंढरपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील (Pandharpur-Guhagar National Highway) कऱ्हाड-विटा मार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील (Krishna River) पुलावर सातत्याने वाहतूक जाम होत आहे. सध्या पुलाच्या शेजारील जुना पूल पडल्याने तेथे नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळं सध्या एकाच पुलावरुन दुहेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळं वाहनधारकांना दररोज मोठी कसरतच करावी लागत आहे. आज बुधवारी सकाळीच कऱ्हाड-विटा मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तासाहून अधिक काळ जाम झाली आहे.

Karad-Vita Highway
Political News : दोन दिवसांत ठरणार अध्यक्षपदाचा 'हुकमी एक्का'

त्यामुळं त्या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक जाम झाल्यामुळे विद्यानगर परिसरातील शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, त्या परिसरात जाणारे नोकरदार यांची मोठी गैरसोय झाली. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक धिम्या गतीनेच सुरु आहे. त्याचा नाहक त्रास वाहनधारकांनाही सहन करावा लागत आहे.

Karad-Vita Highway
याला म्हणतात धाडस! थेट नवऱ्यासमोरच बायकोला म्हंटलं I Love You..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com