esakal | घरपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाने फेटाळाल्यास असा हाेईल सातारकरांचा ताेटा
sakal

बोलून बातमी शोधा

घरपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाने फेटाळाल्यास असा हाेईल सातारकरांचा ताेटा

शासन स्तरावर संबंधित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ताे मंजूर हाेताच नियमीत कर भरणा-यांना त्याचा लाभ हाेईल अशी माहिती पदाधिकारी आणि प्रशासनाकडून देण्यात आली.

घरपट्टी माफीचा प्रस्ताव शासनाने फेटाळाल्यास असा हाेईल सातारकरांचा ताेटा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा पालिकेच्या विविध कामे आणि निधीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच नगरविकासमंत्री एकनाथ गायकवाड यांची भेट घेतली हाेती. यावेळीस उदयनराजेंनी लॉकडाउन काळातील तीन महिन्यांच्या घरपट्टीमाफीचा प्रस्ताव मंत्री शिंदेकडे सादर केला हाेता. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन मंत्री शिंदे यांनी या वेळी दिल्याचे उदयनराजेंच्या कार्यालयातून सांगण्यात आले हाेते. लॉकडाउनच्या काळातील निवासी आणि बिगरनिवासी घरपट्टी
माफीचा पालिकेने केलेला ठराव या वेळी श्री. शिंदे यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावावर लवकरच शासनस्तरावर निर्णय घेण्याचे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले.

खासदार उदयनराजे भाेसले यांच्या सूचनेनूसार सातारकरांची तीन महिन्याच्या काळातील घरपट्टी माफ करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. लाॅकडाऊनच्या काळात विविध उद्याेग व्यवसाय अडचणीत आले हाेते. त्यामुळे
नागरिकांना दिलासा देण्यासाठी सातारा विकास आघाडीने घरपट्टी माफीचा निर्णय घेतला. शासन स्तरावर संबंधित प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ताे मंजूर हाेताच नियमीत कर भरणा-यांना त्याचा लाभ हाेईल अशी माहिती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिली.

डॉक्‍टर.. तुम्ही सुद्धा ! अहाे, हे वागणं बर नव्हं

सातारा पालिकेची संकलीत घरपट्टी सुमारे 12 काेटीच्या आहे. घरपट्टी वेळेत वसूल झाली तर शहर विकासाच्या अनुषंगाने इतर बाबींचा विचार करता येवू शकत असल्याने सातारकरांनी घरपट्टी वेळेत भरावी. सातारा पालिकेने लाॅकडाऊनच्या काळाचा विचार करुन नियमीत घरपट्टी भरणा-यांना तीन महिन्यांची घरपट्टी माफीबाबत शासनस्तरावर प्रस्ताव आहे. ताे मंजूर हाेताच यापुर्वी जर काेणी घरपट्टी भरली असेल तर त्यांची घरपट्टी पुढील वर्षात कमी करण्यात येईल असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले. नागरिकांनी घरपट्टी भरुन शहरविकासासाठी सहकार्य करावे असे आवाहनही बापट यांनी केले. 

नागरिकांनाे आत्ता घरपट्टी भरणे उचित ठरेल

घरपट्टी माफीचा सातारा पालिकेने सादर केलेला प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केल्यास त्याचा नागरिकांना फायदा हाेईल हे निश्चित. दरम्यान घरपट्टी माफ हाेणार म्हणून हातावर हात ठेवून बसल्यास नागरिकांना थकीत मिळकतीच्या रकमेवर लागणारे प्रतिमहिना दाेन टक्के (दंड) व्याज मात्र थांबणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत घरपट्टी भरणे हे उचित ठरेल असे पालिकेचे माजी उपाध्यक्ष शंकर माळवदे यांनी स्पष्ट केले. 

सातारकरांनाे! सावधान जंबाे हाॅस्पिटलचे आयसीयू झाले फुल्ल

अशी भरुन घ्या वीजबिलांची थकबाकी; उदयनराजेंचा MSEB ला सल्ला

Viral Video : जिल्हा न्यायाधीशांस टाेल मॅनेजरने शिकविला नियमांचा धडा; पैसे दिल्यानंतरच साेडले वाहन 

loading image
go to top