esakal | माजगावच्या शुभांगी कांबळेंची कामगिरी; तीन बांगलादेशी महिलांची केली सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

माजगावच्या शुभांगी कांबळेंची कामगिरी; तीन बांगलादेशी महिलांची केली सुटका

केवळ एका फोनवरून तीन महिलांची सुटका करणे, त्यांना त्यांच्या मूळ गावी पोचविणे हे मोठे आव्हान होते. पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्यामुळे हे शक्‍य झाल्याचे शुभांगी कांबळे यांनी ई-सकाळशी बाेलताना सांगितले.

माजगावच्या शुभांगी कांबळेंची कामगिरी; तीन बांगलादेशी महिलांची केली सुटका

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि.सातारा) : तीन बांगलादेशी महिलांची वेश्‍या व्यवसायातून मुक्तता करणाऱ्या महिला पोलिसाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. शुभांगी गौरव कांबळे हे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्या नागठाण्यालगतच्या माजगाव (ता. सातारा) येथील रहिवासी आहेत. शुभांगी कांबळे या सध्या मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. सेवा बजावताना नियंत्रण कक्षात अनोळखी महिलेचा फोन आला. आपल्याला वेश्‍या व्यवसायासाठी मुंबई येथे आणल्याची माहिती तिने दिली. 

या माहितीनुसार शुभांगी यांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करत संबंधित महिलेचे लोकेशन तपासले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहून संबंधित महिलेपर्यंत पोचण्यात यश मिळविले. या महिलेकडून माहिती घेतल्यानंतर आणखी दोन महिलांनाही अशाच पद्धतीने व्यवसायासाठी मुंबईत आणले असल्याचे स्पष्ट झाले. या तिन्ही बांगलादेशी महिलांना वेश्‍या व्यवसायासाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांची पोलिसांनी सुटका केली.

महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु

त्यानंतर त्यांच्या मूळ गावी पोचविण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभांगी कांबळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते.

केवळ एका फोनवरून तीन महिलांची सुटका करणे, त्यांना त्यांच्या मूळ गावी पोचविणे हे मोठे आव्हान होते. पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्यामुळे हे शक्‍य झाले 

शुभांगी कांबळे, माजगाव (ता. सातारा)

Edited By : Siddharth Latkar

loading image