esakal | कऱ्हाडकरांनाे थांबा! अनोळखी व्यक्तीच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडकरांनाे थांबा! अनोळखी व्यक्तीच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका

याबाबत माने यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार खान तपास करत आहेत.

कऱ्हाडकरांनाे थांबा! अनोळखी व्यक्तीच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : एटीएममधून पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला गडबड आहे, असे म्हणून एकाने एटीएम कार्डचा पासवर्ड माहिती करून घेऊन हातचलाखीने 20 हजार रुपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. त्याप्रकरणी चंद्रकांत शंकर माने (वय 35, रा. गोळेश्‍वर, ता. कऱ्हाड) यांनी फिर्याद दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी - चंद्रकांत माने हे पैसे काढण्यासाठी काल येथील पंजाब नॅशनल बॅंकेखालील एटीएम मशिनमध्ये गेले. त्या वेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागे आला. त्या वेळी माने यांनी त्याला बाहेर जाण्यासाठी सांगितले असता तो तेथेच थांबून राहिला. त्या वेळी माने यांनी एटीएममध्ये कार्ड काढून पिनकोड टाकून पाच हजार रुपये काढले. त्यानंतर आणखी पैसे काढायचे असल्याने त्यांनी पुन्हा एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकले. त्या वेळी मागे असलेल्या अज्ञात इसमाने मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे, असे म्हणून माने यांचे एटीएम कार्ड घेतले. तेव्हा पैसे निघाले नाहीत. तो इसम इथे खूप गर्दी आहे, मी जातो, असे म्हणून तो एटीएममधून निघून गेला.

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी नव्या वर्षात राज्यभर आंदोलन : प्रा. मच्छिंद्र सकटे

त्यानंतर कार्ड एरर दाखवत असल्याने माने तेथून बाहेर गेले. त्यानंतर थोड्या वेळाने माने यांच्या मोबाईलवर 10 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्या वेळी माने यांना अनोळखी व्यक्तीविषयी शंका आली. म्हणून त्यांनी एटीएम कार्ड पाहिले असता त्यांच्याकडे दुसरेच एटीएम कार्ड असल्याचे लक्षात आले. त्यावेळी माने यांना आणखी 10 हजार रुपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यामुळे माने यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत माने यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार खान तपास करत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुक लढविणा-यांना सुटी दिवशीही अर्ज भरता येणार

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top