esakal | धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सातारा सिंचन विभागास यश
sakal

बोलून बातमी शोधा

धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सातारा सिंचन विभागास यश

आज(सोमवारी) उरमोडीचे पाणी खटाव व माण तालुक्‍यांसाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे पुराचे पाणी पावसाळ्यात दुष्काळी तालुक्‍यांना सोडण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

धरणांतील पुराचे पाणी 'या' दुष्काळी तालुक्‍यांना मिळणार ; सातारा सिंचन विभागास यश

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जलसंपदा विभागाने यावेळेस धरणांतून सोडले जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी सोडण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील धोम-बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणांतून दुष्काळी फलटण, खंडाळा, माण व खटाव तालुक्‍यांत पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडीचे पाणी आज(सोमवारी) कालव्याव्दारे खटाव, माणला सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणांतून नदीपात्राव्दारे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी तालुक्‍यांना सोडण्यात सातारा सिंचन विभागाला यश आले आहे. 

यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला तरी पावसाने सरासरी पूर्ण केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने प्रमुख सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत धरणांतून 38 हजार 796 क्‍युसेक पाणी वाहून गेलेले आहे. हे पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्‍यांना सिंचनासाठी सोडावे, असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यानुसार ज्या धरणांची कालव्यांची कामे पूर्ण आहेत, अशा धरणांतून दुष्काळी तालुक्‍यांत पाणी सोडण्याचा निर्णय सातारा सिंचन विभागानेही घेतला. त्यानुसार धोम-बलकवडी धरणातून फलटण व खंडाळा तालुक्‍यांत पाणी सोडण्यात आले आहे. तसेच उरमोडीतूनही खटाव व माण तालुक्‍यांत पाणी सोडले जाणार आहे. पण, उरमोडीचे पाणी कोंबडवाडी येथे उचलून खटाव व माण तालुक्‍यांसाठीच्या कालव्यात सोडावे लागणार आहे. त्यासाठी पंपहाउस चालविण्यासाठी वीजबिलाचा खर्च कशातून करायचा, असा प्रश्‍न सातारा सिंचन विभागापुढे आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील घसरण पाचगणीकरांसाठी चिंताजनक

कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनास बंदी, कऱ्हाड पालिकेची 'ही' पर्यावरणपूरक संकल्पना

कोंबडवाडी येथून पाणी उचलण्यासाठी पंप चालवावे लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या वीजबिलाचा खर्च जास्त आहे. यापूर्वी दुष्काळी निधीतून हा खर्च केला जात होता. मात्र, आता कोरोनाच्या साथीच्या काळात निधीची कमतरता आहे. परिणामी पंपहाउसचे वीजबिल कोण भरणार, हा प्रश्‍न सातारा सिंचन विभागापुढे आहे. तरीही कालव्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणापर्यंत उरमोडीचे पाणी सोडण्याचा निर्णय सातारा सिंचन विभागाने घेतला आहे. आज(सोमवारी) उरमोडीचे पाणी खटाव व माण तालुक्‍यांसाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे पुराचे पाणी पावसाळ्यात दुष्काळी तालुक्‍यांना सोडण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय यशस्वी झाल्याचे चित्र आहे. 
सध्या (रविवार, ता.23) जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठा टीएमसी असा आहे : कोयना 90.56, धोम 11.16, बलकवडी 3.62, कण्हेर 8.75, उरमोडी 9.18, तारळी 5.45. 

बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पसरणीतील युवकाचा मृत्यू 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद

धरणनिहाय सुरू असलेला विसर्ग 

सध्या (रविवार, ता. 23) धरणनिहाय सुरू असलेला विसर्ग (क्‍युसेकमध्ये) असा : कोयना : 27 हजार 871, धोम 2527, बलकवडी 302, कण्हेर 2757, उरमोडी 1748, तारळी 1530. वीजनिर्मितीसाठी सोडलेले पाणी (क्‍युसेकमध्ये): कोयना 2100, धोम 198, बलकवडी 302, कण्हेर 550, उरमोडी 400.

Edited By  : Siddharth Latkar

loading image
go to top