esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

satara

जिल्ह्यात ३४० गावांत आता जनावरांचे लसीकरण

sakal_logo
By
प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील १७० पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या अंतर्गातील ३४० गावांमध्ये पशुवैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जनावरांचे लसीकरण, विविध प्रकारच्या तपासण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरांचा लाभ जिल्ह्यातील पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्ह्यात १७० पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा वेळेत मिळाव्यात व पशुधनाचे आरोग्य अबाधित राहून पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्याच्‍या हेतूने दवाखान्यांमार्फत विविध शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत दोन गावांमध्ये लसीकरण केले जात आहे.

हेही वाचा: राज्यभरातील ग्रामीण शिबिरांमध्ये आता लायसन्ससाठी टॅबद्वारे परीक्षा

या शिबिरांमध्ये पशुधनावर औषधोपचार, कृत्रिम रेतन, जंतनिर्मूलन, गोचिड-गोमाश्या निर्मूलन, गर्भतपासणी व वांझ तपासणी, शस्त्रक्रिया आणि वंध्यत्वावर यशस्वीपणे औषधोपचार करण्यात येत आहेत. पशुधनाच्या आवश्यकतेनुसार पशुपालकांना खनिज मिश्रणे, वीट व कॅल्शियमसारखी खनिज मिश्रणे, जीवनसत्त्वे पावडर, जंतुनाशक गोळ्या व अनुषंगिक औषधांचे वितरण करण्यात येत आहे. नऊ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळखुरकत लसीकरण फेरी अंमलबजावणी सुरू आहे. सर्व पशुधनास टॅगिंग व लसीकरण करणे बंधनकारक असून, त्यानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत सद्य:स्थितीत लसीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोनाच्या नव्या 481 रुग्णांची भर; 3 जणांचा मृत्यू

गेली दीड वर्ष कोरोनाच्या संकटात दुग्ध आणि कुक्‍कुटपालन या व्यवसायाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून या संकटात अनेक योजना प्रभावी राबवून शेतकऱ्यांना हातभार लावला असून, पशुधन सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण शिबिरांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- मंगेश धुमाळ , सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती

loading image
go to top