esakal | गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे, 'वंचित'कडून राजीनाम्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे, 'वंचित'कडून राजीनाम्याची मागणी

विधानसभेत प्रत्येक मंत्री संविधानिक पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतात. मात्र, याचा विचार न करता दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य मंत्री देसाई यांनी केले. या वक्तव्याची विधानसभेच्या शिस्तभंग संसदीय समितीने चौकशी करून योग्य कारवाई करून त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.

गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे, 'वंचित'कडून राजीनाम्याची मागणी

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समन्वयाची भूमिका न घेता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असंविधानिक वक्तव्य केले. त्यांनी संविधानिक पदाची मर्यादा न पाळल्याने मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आज (ता. ९) वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे. 

विधानसभेत प्रत्येक मंत्री संविधानिक पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतात. मात्र, याचा विचार न करता दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य मंत्री देसाई यांनी केले. या वक्तव्याची विधानसभेच्या शिस्तभंग संसदीय समितीने चौकशी करून योग्य कारवाई करून त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करावे. संविधानिक मंत्रिपदावर असणारी व्यक्ती कोणत्याही समुदायाची राहत नसून ती सर्व राज्याची असते. 

छत्रपतींच्या वारसदारांचा अपमान कदापि सहन करणार नाही : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

या बाबीचे भान देसाई यांना नसल्याने त्यांनी चुकीच्या मानसिकतेतून वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा वंचित आघाडीला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image