उपवळेतील पीडितेला न्याय द्या, साता-यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

उपवळेतील पीडितेला न्याय द्या, साता-यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

सातारा : उपवळे (ता. फलटण) येथे होलार समाजातील संशयित मृत्यू झालेल्या मुलीच्या घटनेची चौकशी करून योग्य न्याय द्यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब केंगार, श्रीरंग वाघमारे, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे, कल्पना कांबळे, शशिकांत खरात, गणेश भिसे आदी उपस्थित होते. 

या घटनेतील पीडित मुलगी चार ते पाच दिवस बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या घटनेची तत्काळ चौकशी करावी, पीडित कुटुंबीयांची जबाबदारी राज्य सरकारने घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी, पीडित कुटुंबीयातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देऊन योग्य पुनर्वसन करावे, या कुटुंबीयांना गावगुंडाकडून कुठलाही त्रास होणार नसल्याची खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे, या घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com