जनतेच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन; 'वंचित'चा इशारा

जनतेच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन; 'वंचित'चा इशारा

सातारा : कोविडच्या प्रकोपाने आणि शासनाने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधामुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच सरकार काहीतरी सहकार्य करेल, अशी आशा होती. घरगुती वीजबिले थकीत असल्याने सरकारने अशा वीजबिलांबाबत मदत सोडाच; पण साधी सहानुभूतीसुद्धा दाखवली नाही. त्यावर लोकप्रतिनिधींनीही मौन पाळल्याने सर्वसामान्य जनतेला अंधारात बसावे लागत आहे. त्यामुळे सर्व जनतेने एकत्र येऊन लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तीव्र आंदोलन करून न्याय मिळवला पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले. 

खंडाईत म्हणाले , सर्वसामान्य जनता एका बाजूला कोविडच्या निर्बंधांना आणि दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देत आहे. अशातच थकीत वीजबिलांसाठी काही तरी मदत सरकार करेल, अशी आशा होती. पण, त्यावर सरकारने जनतेची घोर निराशाच केली आहे. त्यावर न थांबता काही हप्ते करून वीजबिल भरण्यास मुभा देणे गरजेचे होते. मात्र, थेट कनेक्‍शन कट करून सर्वसामान्य जनतेला अंधारात बसविले आहे. या सर्व बाबींचा सरकारने विचार करून लवकरात लवकर ही वीज कनेक्‍शन तोडण्याची प्रक्रिया थांबवावी. यासाठी सर्व विधानसभा व लोकसभेवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेऊन जनतेला न्याय द्यायला हवा आहे.
 
जनता आर्थिक विवंचनेत असतानासुद्धा त्यांच्यावर ऐन उन्हाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेक संघटनांनी निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा देऊनही सरकार मदतीची भूमिका घेताना दिसत नाही. सर्वच लोकप्रतिनिधी या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसले आहेत. ही बाब निषेधार्ह असून, या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आता जनतेने आपल्या घरातील अंधार दूर करण्यासाठी त्यांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले पाहिजे. तरच हे लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत, असेही श्री. खंडाईत यांनी म्हटले आहे. 

महावितरणची विशेष माेहिम सुरु. थकीत वीज बिल भरा अन्यथा पूरवठा ताेडणारच

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com